पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीचे फौजेच्या अधिका-यास पत्र १८५ एकादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. गवताच्या लहळ्यास ° कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळया आहेत तितक्या एक एक जळों जातील. तेव्हां मग कांहीं कुणवियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकीद ३१ करावी तैसी केली तन्ही कांहीं खण कराया एक लाकूड मिळणार नाहीं, एक खण होणार नाहीं; हें तों अवघियाला कळते. याकारणे, बरी ताकीद करून, खासे खासे असाल ते हमेशा फिरत जाऊन, रंधनेकरितां, आगट्या जाळिता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. खण, गवत वाचेल ते करणे. म्हणजे पावसाळा घोडीं वांचलीं नाहीं तर मग, घोडीं बांधावीं नलगेत, खायास घालावें नलगे. पागाच बुडाली. तुम्ही निसूर ३२ जालेंत ऐसे होईल. याकारणे तपशिलें तुम्हांस लिहिले असे. जितके ख़ासे खासे जुमलेदार, कारकून आहां तितके हा रोखा ३ तपशिले ऐकणे आणि हुषार राहणे. वरचेवरी रोजाचा रोज, खबर घेऊन, ताकीद करून, येणेप्रमाणे वर्तणूक करितां ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्यास-मराठियाची तो३४ इज्जत ३ ५ वाचणार नाहीं, भग रोजगार कैसा, खळक ३ ६ समजों३ ७ ज्यास्ती ३८ केल्यावेगळे सोडणार नाहीं. हे बरे म्हणून वर्तणूक करणे. छ.३१ १२ सफर. ४० अभ्यास :--मोगलापेक्षां मराठी राज्य कोणत्या बाबतींत भिन्न असावे अशी शिवाजीची विचारसरणी दिसते ? प्रस्तुतचे पत्र छ क्रमांक १ चे पत्र वाचून उत्तर द्या. ਕਿਸ਼ਨਰ ਫਿਲ ਨੂੰ ਲਹਿ ਨ ਸੀ . ਉਹ ३० पेढ्या, ३१ कडक हुकूम, ३२ निष्काळजी. ३३ हुकूम३४ तर, ३५ अनू, ३६ क्षुद्र, नीच, ३७ समजून, ३८ कडक शिक्षा केल्यावांचून, ३९ चंद्र. वारावा-शुा द्वादशी. ४० सफर महिना. [ २९