पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/213

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ १८४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास । रातीव, गबत मागाल. असेल तोंवरी धुंदी करून चाराल. नाहींसें जालें म्हणजे मग कांहीं पडत्या पावसांत मिळणार नाहीं. उपास पडतील, घोडीं मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिलीं ऐसे होईल. व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचे एथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जीं कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिली आहेत तेहि जाऊं लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही ! ऐसा तळतळाट होईल ! तेव्हां यतीची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्हीं बरें जाणून, सिपाई हो अगर पावखलक १९ हो, बहुत यादी ° धरून वर्तणूक करणे. कोण्ही पागेस अगर मुलकांत गांवोगांव राहिले असाल त्यांणीं रयतेस काडीचा अजार १ द्यावयाची गरज नाही. आपल्या राहिल्या जागांतून बाहीर पाय घालाया गरज नाही. साहेबी खजानांतून वांटणिया पदरीं घातलिया आहेत. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यांस गबत हो, अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल तें रास २ घ्यावे, बाजारास जावें, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती २ ३ अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजवीजान दाणा रातीव कारकून देत जातील तेणेप्रमाणेच घेत जाणे; की उपास न पडता रोजबरीज खायला सांपडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीच कारकुनासी धसपस कराया अगर अमकेंच द्या तमकेंच द्या एस म्हणाया, धुंदी करून खासदारकोठींत २४ कोठारांत शिरून लुटाया गरज नाहीं. व हल्ली उन्हाळ्याला आहे तइसे खलक २५ पागेचे आहेत, खण' धरून राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करतील कोण्ही भलतच जागा चुली रंधनाला ७ करितील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिल आहे ऐसे अगर वारे लागले २८ आहे ऐसे मनास न आणितां म्हणजे अविस्राच" । १८ ठराविक प्रमाण १९ पायदळांतील सैनिक. २० काळजीपूर्वक २१त्रास.२२ घाऊक, २३ बळजबरी, २४खासकोठींत, २५ लोक (नीच जातीचे): २६ झोपडी, घर, २७ स्वयंपाकाला, २८ सुरू झालें, सुटलें, २९ अकस्मात् २८]