पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/215

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १६ । । ।

  • गृहकलह बरा नव्हे इतिहाससंग्रह।

J शक १५९८ वर्ष १ अं. ५ व ७ पृ. ३६, ३७) इ. स. १६७७ [ अलीकडील संशोधनाने शिवकालीन पत्रे पुष्कळ सांपडली असली तरी खास शिवाजीची थोडीच आहेत. त्यांपैकीं हें एक महत्त्वाचे आहे. यांत शिवाजीच्या जिजीवरील स्वारीची हकीकत आली आहे. एकोजी हा शिवाजीचा धाकटा भाऊ. त्याच्याशी वागतांना राजकारण साधावें व भाऊपणा तुटू नये हा शिवाजीचा दुहेरी यत्न होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस दूर आपल्या राज्याची शाखा बसवावी हे शिवाजीचे राजकारण होते. एकोजीने अर्नी, बंगलूर कोल्हार, होस्कोटे, तंजावर वगैरे ठाणीं दिल्यास त्याच्या मोबदला शिवाजी एकोजीस तुंगभद्रेच्या उत्तरेस पन्हाळा प्रांतीं मुलूख देण्यास तयार होता. वाढत्या विजयामुळे ' देवीची आपणांवर कृपा आहे' असा विश्वास शिवाजीस वाटू लागल्याचे या पत्रांत व्यक्त झाले आहे. प्रस्तुत पत्र, कै. द. व. पारसनीस यांनी इ. स. १९०८-१९१६पर्यंत ‘इतिहास संग्रह' नांवाचे जे उपयुक्त मासिक चालविले होते त्यांत वर्ष १ लें अं. ५ व ७ पृ. ३६-३७ वर 'तंजावरचे राजघराणे' या प्रकरणांत छापले आहे.] श्री सहस्रायु चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री येकोजी राजे प्रति राजश्री शिवाजी राजे, आशीर्वाद येथील क्षेम जाणोन स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. उपरी कैलासवासी साहेबी कैलासवास केला त्यास आजी तेरा वर्षे जाली. महाराजांचे पैके व जडाव व हाती व घोडे व मुलूख अवघेहि राजश्री रघुनाथपंतीं तुम्हांला राज्यावर बैसवून संपूर्ण राज्य तुमचे हातीं दिले. ऐशियास आमचा अर्धा दांटा तेरा वर्षे तुम्हीच खादला; आम्हीं जरी तुम्हांजवळी मागावे, तर बहुत दूर होतो. वन्या बोलें तुम्हीं देणार नव्हां म्हणून तेरा वर्षे सबुरी केली. मनामध्ये ऐसा विचार केला की बर। महाराजांचे पुत्र तेही आहेत. जे समयीं आम्हास फावेल, ते समयी आम्ही वेव्हार सांगोन घेऊ. असे मनी धरोन होतो. १ हत्ती. ३० ]