Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास


[ बिआवर संस्थानांतील पं. मीठालाल व्यास यांच्या संग्रहांतील चुन्या बाडांत शिवकालीन अनेक कुंडल्या आहेत व त्या विश्वसनीय आहेत, याविषयी संशोधक रायबहादूर गौरीशंकर ओझा यांनी सविस्तर विवेचन केले आहे. त्यावरून बाडांतील शिवाजी महाराजांच्या कुंडलीचे हस्ताक्षर शिवकालीन शिवराम ज्योतिषाच्या हातचे आहे असे ठरते. ते जन्म टिपण पुढे दिले आहे. शकवर्षसंख्येत १३५ मिळविलें म्हणजे संवत्सरवर्षसंख्या येते. १५५१ + १३५ = १६८६ ]

संवत् १६८६, फुल्गून वदिय शुक्रे उ. घटी ३०।९ राजा शिवाजी जन्मः । र १०।२३ ल ४१४९, ६ चं. 9 श ३ A 4. ११ ) - १ - ---'शिवभारत' प्रस्तावना-पृष्ठ ८९ 1 ------- अभ्यास :--यांतील समकालीन उतारे कोणते ? त्यांचे महत्त्व काय ? त्यांत जन्मतिथि कोणती दिली आहे ? चिटणीशी बखरींत काय जन्मतिथि दिली आहे? त्यांतील खरी तिथि कोणती असावी? तुमच्या मताला पोषक कारणे सांगा. २. शिवभारतांत आंकड्यांत तिथि न देतां भूबाणप्राणचंद्राद्वैः अशा शब्दसंकेतांत दिली आहे. असलीं कांहीं उदाहरणें संस्कृतज्ञांस विचारा. १६] ।