Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ महाष्ट राज्य । ९ :: : । महाष्ट्र राज्य शिवचरित्र प्रदीप, जेधेकरीना* पः ४३-४४ [ राज्यस्थापनेपूर्वी मावळांत जमवाजमव करणा-या लोकांना राज्यस्थापनेच्या काय कल्पना होत्या ते या उता-यावरून कळून येते. या उता-यांत ' महाष्टराज्य' हा महत्त्वाचा शब्द आहे. ] मावळांत जमवाजमव । त्यावरी राजश्री स्वामीनी' हुकुम केला की वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येक जागा बैसोन त्यांचा मुदा मनास आणवणे त्यावरी कान्होजी नाा व अवघे मावळचे देशमुख येके जागा बैसले तेव्हा अवघे देश मुख बोलिले की तुमचा विचार काये तो सांगणे तेव्हा बोलले की आम्ही राजश्री स्वामीच्या पायासी इमान घरून वतनास देखील पाणी सोडिले आम्ही व आपले लेक देखील राजश्री स्वामी पुढे खस्त होवे यैसा आमचा दृढ विचार आहे तुमचा मुदा काय तो बोलणे मुसलमान बेइमान आहे कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे महाष्टराज्य आहे अवघियानी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी संनिघ राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिंमतीच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा अवघे देशमुख बोलिले की तुमचा विचार तोच आमचा विचार इमानपुरस्कर आहे यैसे बोलिले तेव्हा अवघे देशमुख घेऊन राजश्री स्वामी संनिध आले अवघ्यानी शफत केली मग अवघ्यास भोजनास घातले त्यावरी अगदी माव लची जमाव केला. अभ्यास :--‘महाराष्ट्रराज्य' स्थापन करण्यांत त्या वेळच्या लोकांचे काय हेतू होते ? | *हकीकत. जेधेकुटुंबाची हकीकत. असे करीने पूर्वी लिहिले जात व वंशपरंपरा त्यांतील हकीकत वाढविली जाई. १ मोकळी जागा ' शिवाजी'साठीं सोडली आहे. बहुमानार्थी नांव न घेता पत्रांत मोकळी जागा सोडण्याची चाल असे. २ मुद्दा. ३ कान्होजी जेधे, ४ नाईक, ५ झिजावे, खर्ची पडावे. ६ विश्वासपूर्वक. ७ निर्भेळ. [ १७