पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/200

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीचा जन्म १७१ --३-- *भूवाणप्राणचन्द्राब्दैः सम्मिते शालिवाहने ।। शके संवत्सरे शुक्ल प्रवृत्तेचोत्तरायणे ॥ शिशिरतौं वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने । कृष्णपक्षे तृतीयायां निारी लग्ने सुशोभने ॥ अनुकूलतरैस्तुंगसंश्रयैः पञ्चाभग्रहः । व्यंजिताशेषजगति स्थिरसाम्राज्यवभवम् ॥ अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं ।। कमनयतमग्रवमुन्नतस्कन्धमण्डलम् ॥ लिकान्तामलकान्तकुन्तलाग्नावरााजतम् ।। सरोजसुन्दरदृशं नवकिंशुक नासिकम् ॥ सहजस्मेरवदनं घनगंभीर निस्वनम् ।। महारस्कं महाबाहुं सुषुवे साद्भुतं सुतम् ॥ शालिवाहन शके १५५१ शुक्लनाम संवत्सरीं, उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्रीं शुभ लग्नावर, अखिल पृथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते ; त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हंसरे, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. यतःशिवगिरेमूनि जातसः पुरुषोत्तमः । ततःप्रासद्धा लोकेऽस्य शिव इत्याभिधाऽभवत् ॥ | शिवनेरी किल्ल्यावर या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे * शिव असे नांव लोकांत प्रसिद्ध झाले. -शिवभारत, अध्याय ६ श्लोक २६ ते ३१ व ६३ * भू-१, बाण-५, प्राण-५, चंद्र-१ = १५५१ द्र १५