फादर स्टीफनसनचे मराठीवरील प्रेम १६१ ४ । । । फादर स्टीफनसनचे मराठीवरील प्रेम [ अमुक धर्माची अमुक भाषा असते हे मानणे चुकीचे आहे. कोठल्याहि भाषेत धमांची शिकवण देता येते. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनीं भारतवर्षात आपल्या धर्माचा प्रचार करतांना मराठी, हिंदी आदि तत्प्रांतीय भाषांचा उपयोग केला. शिवाजी महाराजांच्या पूर्वी फादर स्टीफनसन नांवाच्या गोंवा प्रांतांतील धर्मोपदेशकाने 'ख्रिस्तपुराण' मराठीत लिहिलें व छापून प्रसिद्ध केलें ! ग्रंथाच्या आरंभी त्याने छोटी प्रस्तावना गद्यांत लिहिली असून बाकी सर्व पुराण ओवीबद्ध आहे. या पुराणाचे दोन भाग असून एकूण अव्यांची संख्या १०,९६२ आहे. ब्राह्मण किंवा विप्र किंवा ख्रिस्तानुयायी शंका किंवा प्रश्न विचारतो व धर्मगुरु त्यांस उत्तरे देतो असे संवादात्मक स्वरूप ग्रंथास आहे. काव्य या दृष्टीने या पुराणास मानाचे स्थान द्यावे लागेल असे डॉ. कोतकरासारख्यांचे मत आहे. भाषा मराठी असली तरी लिपि रोमन आहे. लेखकाला रोमन लिपीचा सराव व त्याच लिपींत छपाई करणे शक्य होते म्हणून ही लिपि त्याने स्वीकारली असावी. देवनागरी टाईप त्या वेळीं अर्थातच तयार झाले नव्हते. प्रस्तावनेन फादर स्टीफनसन लिहितो :* "He sarva marathiye bhassena lihile Hea हे सर्व मराठिये भासेन लिहिले हया dessinchea bhassabhittur he bhassa Paramesuarachea देशीच्या भासांभितुर हे भासा । | परमेश्वराच्या vastu niropunni yogue dissali..... वस्तु निरोपुणी योग्य दिसली.... या ग्रंथाच्या प्रथम अध्यायांत ओंव्या १२१-१२५ मध्ये त्याने मराठी भाषेवरील अनन्य साधारण प्रेम व्यक्त केले आहे, त्याच ओंव्या पृढे दिल्या आहेत.
- त्याने लिहिल्याप्रमाणे रोमन लिपींतच हा मजकूर पुढे दिला आहे. चटदिशीं अर्थ लक्षांत यावा म्हणून त्याखाली नागरी लिपीत तोच मजकूर जुळविला आहे.