१६२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ला जेसुइट ११,५७९ मध्य ५"हिला. प्रस् जिल्ह्यांत सा कलेल्या) कांही अद्याप उपलब्ध न -- फादर थॉमस स्टीफन्सन हा एका इंग्रज व्यापाण्याचा मुलगा. हिंदुस्थानांत आलेला हाच बहुधा पहिला इंग्रज. त्याचा जन्म सन १५४९ असावा. त्याचे शिक्षण झाल्यावर त्याच्या लक्षात आले कीं तत्कालीन इंग्लंडांत ‘क्याथोलिक पंथाप्रमाणे वागणे अवघड होय, म्हणून तो रोमला जेसुइट पंथाच्या संस्थेला मिळाला. त्या संस्थेतर्फे लिस्बनमार्गे तो गोव्यास इ. स. १५७९ मध्ये येऊन पोहोचला. त्याच भागांत तो ४० वर्षे धर्मप्रसाराचे कार्य करीत राहिला. प्रस्तुत पुस्तक त्याने मुळांत पोर्तुगीज भाषेत लिहिले व मग त्याने त्याचा अनुवाद मराठींत केला (इ. स. १६१४). ते प्रथम १६१६ मध्ये छापलें, पण त्या वेळची एकहि छापील प्रत अद्याप उपलब्ध नाहीं. हस्तलिखित (नक्कल केलेल्या) कांहीं प्रती गोंवा व दक्षिण कानडा जिल्ह्यांत सांपडल्या आहेत. इ. स. १६५४ पर्यंत त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. फादर स्टीफन्सनने ‘ कोंकणी भाषेचे व्याकरण' हि लिहिले, त्यांत फादर रिवेरोने (Ribero) कांहीं भर घातली. हे पुस्तक या दोघांच्या मृत्यूनंतर इ. स. १६४० मध्ये प्रकाशित करण्यांत आलें. फादर स्टीफन्सन इ. स. १६१९ मध्ये मरण पावला. अलीकडच्या काळांत मंगलोर येथील श्री. जोसेफ एल्. सलढाना (Saldhana) यांनी हा ग्रंथ संपादन करून इ. स. १९०७ मध्ये प्रसिद्ध केला. त्यांत ही सर्व माहिती विस्ताराने व आधारासहित दिली आहे. ] परमशास्त्र जगीं प्रघटावेया' बहुतजनां फलसिधी होवावया। भासा बांधोनी मराठिया कथा निरोपिली ॥ १ ।। जैसी हरळांमाजी रत्नकिळा' की रत्नामाजी हिरा निळा । तैसी भासांमाजी चोखळा । भासा मराठी ॥२॥ १ प्रगट करण्यास. २ लहान दगड. ३ रत्नाचे तेज. ६]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/191
Appearance