पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ १६० हिंदुस्थानची साधनरूप इतिहास देशियेचेनि नागरपणे ।। शांतु शृंगारातें जीणें ।। वोविया की होति लेणे ।। साहित्यासी ॥ ज्ञानेश्वरी (राजवाडे प्रत), अध्याय १० वा, ओंवी ४१ [ स्थूल अर्थ :–ही मराठी देशभाषा खरी पण तिच्या सौंदर्याच्या आधाराने शांतरस शृंगाररसावरहि वरकडी करील, आणि या मराठी ओव्या तर सुंदर वाङमयाला केवळ साजाप्रमाणे साजतील. ] एकनाथ संस्कृत वाणी देवें केली ।। तरि प्राकृत काय चोरापासोनि झाली ? असोतु या अभिमान भुली। वृथा बोली काय काज' ॥ --एकनाथी भागवत, अध्याय १ ला, ओंवी १२९. संस्कृत प्राकृत परवडी । सज्ञान सेविति स्वानंद गोडी। गाय काळी आणि तांबडी । परि दुध वाकुडी चवी नाहीं ॥ एकनाथी भागवत, अध्याय २९-१०३३ लेखनकाल---शके १४९५ १. असो. हा सर्व अभिमानाचा भ्रम आहे त्याची व्यर्थ चर्चा कशाला ?' २. वर्णनांत. संस्कृत किंवा प्राकृतांत (मराठीत ) वर्णन लिहिले तरी वाचक त्यांतला आनंद चाखतात. ३. गाय काळी किंवा तांबडी असली तरी तिच्या दुधाला कांहीं निराळी चव नसते. तसेच भाषेचे आहे असा भावार्थ. ४]