पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|११६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २१ । । । । सारा आकारणीत सुधारणा [ऐने अकबरी हा ग्रंथ अबुल फझल याने लिहिला. अबुल फझलचा जन्म १४-१-१५५१ रोजी झाला व तो १२-८-१६०२ रोजी मारला गेला. याने ‘अकबरनामा' या नांवाचा एक बडा ग्रंथ लिहिला. ऐने अकबरी हा त्या ग्रंथाचा तिसरा भाग समजला जातो. पण ऐने अकबरींतील राज्यव्यवस्थेच्या तपशीलवार माहितीमुळे या ग्रंथास स्वतंत्र महत्त्व आहे. गृहव्यवस्था, सैन्यव्यवस्था व साम्राज्यव्यवस्था असे ऐने अकबरीचे तीन भाग आहेत. पण गृहव्यवस्था या शब्दाने त्यांतील मजकुराचा नीट . कारण या पहिल्याच भागांत टांकसाळी, हत्तीखाना, वस्तूंचे बाजारभाव, लेखन व रंगकला इत्यादींसंबंधी इतकी तपशीलवार माहिती आढळते कीं, सोळाव्या शतकाचा हिंदुस्थानचा सामाजिक इतिहास लिहिणा-याने हें ज्ञानभांडार अवश्य लुटावे. अकबरास धर्मविषयक अन्तर्ज्ञान होते असे अबुल फझल मानतो. पण तो लिहितो कीं, ‘त्यासंबंधीचे योग्य शब्दांत कोण वर्णन करू शकेल व कोणी केले तरी ते वाचून समजणारा कोण आहे ? तरी या भानगडीत पडण्यापेक्षा मी त्याचा (अकबराचा) ऐहिक मोठेपणा ध्यानांत येण्याजोग्या गोष्टी तेवढ्या सांगतो. असे म्हणून त्याने ऐने अकबरीस सुरुवात केली आहे. (ऐने अकबरी, ब्लॅकमनचे भाषांतर, अबुल फझलची प्रस्तावना पृ. १० पहा.) | ‘अकबरनामा' या ग्रंथाच्या पहिल्या भागांत तैमूर ते बाबरपर्यंतची त्रोटक हकीकत आहे. यानंतर हुमायूनची सविस्तर हकीकत आणि अकबराच्या कारकीर्दीच्या शेहेचाळीस वर्षांची सालवार हकीकत दुस-या भागांत आली आहे. तीच पुढे इनायतुल्ला मुहिबअली याने अकबराच्या मृत्यूपर्यंत आणून सोडली आहे. | अबुल फझलची भाषा कृत्रिम आहे. अकबराच्या दोषांवर त्यांत पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे असे म्हणणे वावगे होणार नाहीं. कदाचित् भाषेच्या अलंकार कृत्रिमतेने भाषेस तसे स्वरूप आलें असेंहि म्हणतां येईल. मात्र अबुल फझलच्या लेखनांत जाणूनबुजून सत्यापलाप नाहीं. प्रसंगी त्याची भाषा इतकी जोरदार आहे कीं, बुखान्याचा सुलतान अबदुल्ल म्हणतो की, मला अकबराच्या बाणापेक्षा अबुल फजल्च्या शरसंधानाचे अधिक भय वाटते. इलियट डौसन व्हॉ. ६ पृ. ५ पहा. अबुल फझल हा अकबराच्या राजनीतीला व्यापक तत्त्वज्ञानाची बैठक पुरविणारा थोर पुरुष होऊन गेला यांत शंका नाहीं.] ३२]