Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारा आकारणींत सुधारणा ११७ या अमरकीर्ती बादशाहाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून बुद्धिमान् व निर्लोभी पुरुष, उत्साही व अनुभवी लोकांच्या सहकार्याने दरवर्षी बाजारभाव पाहून ते बादशाहाकडे कळवीत असत. नंतर देशांतील पिकांचे घाऊक उत्पन्न अजमावून व त्यांच्या किंमतीचा अंदाज करून ते सरकारी कराचे दर ठरवीत असत. परंतु या पद्धतींत पुष्कळच अडचणी होत्या. एकंदर करआकारणी अंदाजाने होई, क्षणिक लहरीने करांत वाढ केली जाई, लांच आणि स्वार्थ यांच्या अनुरोधाने आकारणीत फरकहि होई. मुजफरखान आणि राजा तोडरमल यांच्या देखरेखीखाली कारकीर्दीच्या १५ व्या वर्षी सरकारी कराची फेरवांटणी करण्यांत आली होती. पूर्वीपेक्षां जरी ही आकारणी कमी होती तरी देखील अंदाज व प्रत्यक्ष उत्पन्न या दोहोंत फारच फरक पडला. साम्राज्याचा जसजसा विस्तार होऊ लागला, तसतसे चालू भाव निश्चित करणे हें अधिक कठिण होऊ लागले आणि या प्रकरणी लागणा-या उशिरामुळे फार गैरसोयी वाढल्या. शेतकरी तक्रार करीत कीं खूप आवारणी केली, आणि सरकारने जमा केलेल्या सा-याची रक्कम पाहून जमीनदारांचा तिळपापड उडे. बादशाहाने या अडचणींवर उपाय म्हणून १० वर्षांची कायम साराआकारणी ठरविली. यासाठी आपल्या कारकीर्दीच्या १५ व्या वर्षांपासून २४ व्या वर्षाअखेर (इ. स. १५७०-१५८०) जी काय साराआकारणी झाली त्याची त्याने मोजदाद केली व तिचा एकदशांश हा सारा ठरवून दिला. | ही मोजदाद करतांना त्याला विसाव्या ते चोविसाव्या वर्षाचे सान्याचे विश्वसनीय आकडे मिळाले. पण तत्पूर्वीच्या पांच वर्षांचे आकडे मिळविण्या साठी त्याला स्थानिक प्रतिष्ठितांच्या शब्दांवर विश्वासावे लागले. दर वर्षाचे उत्तम पीक व दहा वर्षातील उत्तम पिकाचे वर्ष ही लक्षात घेऊन आकारणी ठरविली गेली. अभ्यास :--१. साराआकारणी ही जमिनीची मोजणी करून ठरवावी हे तत्त्व प्रथम कोणत्या मुसलमान राजाने सुरू केले ? साराआकारणीत अन्याय होऊ नये म्हणून अकबराने कोणती काळजी घेतली ? त्याला कोणत्या अडचणी आल्य ? २. सरकारला सारा घेण्याचा अधिकार का पोहोचतो याची तात्त्विक चर्चा करा. [ ३३