राणी दुर्गावतीचे बलिदान ।
११५ चांगल्या रीतीने पाहिलेला होता. त्याच्या कामगिरीपैकीं ‘गढा'ची विजयप्राप्ति ही महत्त्वाची घटना होय. हा प्रदेश म्हणजे अरण्ये आणि टेकड्या यांनी भरलेला. इस्लामच्या उदयापासून हिंदुस्थानच्या कोणाहि राज्यकर्त्याने हा प्रांत जिंकला नव्हता.
| या वेळी तेथील कारभार राणी दुर्गावती पाहात होती. प्रजेची तिच्यावर भक्ति व विश्वास होता. निमित्ते काढून अनेक वेळेस आपले दूत त्या राज्यांत आसफखानाने पाठविले आणि जेव्हां त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये, परिस्थिति, राणीजवळील पैसा इ. समजून आले तेव्हां त्या प्रदेशावर त्याने सैनिकी स्वारी केली. ५०० हत्ती आणि २० हजार घोडेस्वारांसह युद्ध करण्यास राणी सामोरी आली. दोन्ही सैन्यांनी आपली पराकाष्ठा केली. घोडेस्वारांच्या अग्रभागीं असलेल्या राणीस एक बाण लागला. त्या थोर स्त्रीने जेव्हां पाहिलें कीं, आप णांस आतां कैद केले जाणार तेव्हां तिने माहुताजवळील सुरा घेऊन आपल्या पोटांत खुपसला नि ती गतप्राण झाली. असफखानास विजय मिळाला. चौरागढापर्यंत हल्ला करून तेथे तो थांबला. राणीच्या मुलाने किल्ला लढविला. पण त्याच दिवशीं खानाने तोहि सर केला. राजपुत्र त्या लढाईत घोड्यांच्या टापांखालीं मरण पावला. इतकी रत्ने, सोने, चांदी आणि इतर वस्तु लुटण्यांत आल्या की, त्यांच्या दशांशाचा अंदाज बांधणेहि कठिण आहे. सगळ्या लुटीपैकीं आसफखानाने केवळ १५ हत्ती दरबारांत पाठविले, बाकी सर्व चीजवस्त स्वतःजवळच ठेवली.
अभ्यास:-१. राज्य जिंकण्यासाठी स्वारी करण्यापूर्वी शत्रूची कोणती माहिती मिळवावी लागते ? ही मिळविण्याचीं कांहीं साधनें सांगा. २. राणी दुर्गावतीचे कर्तृत्व कोणते ? तिने सुरा खुपसून जीव दिला हे योग्य झाले असे तुम्हांस वाटते कां ? कारणे सांगा. स्त्रियांनी रणांगणांतून शस्त्रयुद्ध केल्याची भारतीय इतिहासांतील आतांपर्यंतची २-३ उदाहरणे सांगा. ३. स्वाध्याय मालेच्या पुस्तकांतील ‘राणी दुर्गावती' हे पुस्तक वाचा.
८ सा. इ.
[ ३१
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/147
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
