विजयनगरचे समाजदर्शन १०३ हिजरी ८२९ मध्ये (इ. स.१४२८) स्वसैन्याला विरोधून मजबूत स्थळे ताब्यांत ठेवणाच्या माहूरच्या बंडखोर जमीनदारावर अहमदशाह चालुन गेला. बंडखोर लवकरच शरण आला. तो आपल्या हातांत येतांच क्षमा करण्याचे दिलेले वचन मोडून अहमदशाहाने त्याला त्याच्या पांच किंवा सहा हजार अनुयायांसकट ठार केले. तसेच पकडलेल्या स्त्रिया आणि मुले यांना सत्यधर्म स्वीकारण्याची सक्ति केली. या स्वारींत कुल्लम येथील हिच्याची खाण त्याच्या ताब्यात आली. या भागांतील मूर्तीचीं पुष्कळ मंदिरें त्याने जमीनदोस्त केलीं, व त्या जागेवर मशिदी बांधल्या. तेथे धार्मिक कार्यासाठी तेल-दिवा लावता यावा म्हणून कांहीं जमिनी त्या कार्यास त्याने लावून दिल्या अभ्यास :--१. तत्कालिन इस्लाम धर्मप्रधान राजकारणासंबंधाने काय म्हणता येईल ? २. ‘राजाला ठार करण्याच्या यत्नांत आपण प्राण अर्पण करू' असे हिंदु कां म्हणू लागले ? १३ विजयनगरचे समाजदर्शन * [निकोल-दी-कोंती हा ख्रिस्त शक १४२० च्या सुमारास विजयनगर येथे येऊन गेला. इब्नबतूतानंतरच्या सुमारे ८०-९० वर्षांच्या काळांत अन्य कोणा परकीय प्रवाशाने विजयनगरविषयीं कांहीं लिहून ठेवलेले आढळत नाहीं. युरोपियन प्रवाशांपैकी ज्यांनी ज्यांनी विजयनगरासंबंधीं लिहून ठेवलेले आज उपलब्ध आहे व ज्ञात आहे, त्या सर्वात कोंती हा पहिलाच होय. कोंती हा देशजातीने इटालिअन. व्हेनिसमधील घरंदाज कुळांत त्याचा जन्म झाला. लहान वयांतच त्याचा दमास्कस येथील व्यापारी उलाढालींत शिरकाव झाला होता. तो फारसी भाषाहि शिकला. देश पाहण्यासाठी पूर्वेकडील देशांत त्याने २५ वर्षे सपत्नीक प्रवास केला. पोपच्या आज्ञेवरून त्याने आपले प्रवासवृत्त निवेदिले. ते मूळ लॅटिन भाषेत आहे. त्यांतील आपल्याला जरूर असलेल्या भागाचे इंग्रजी रूपांतर हँक्ल्यूइट' मंडळाच्या ‘इंडिया इन् दि फिफ्टीन्थ सेंचरी' ह्या पुस्तकांत मिळते. कोंतोची विजयनगरसंबंधींची साक्ष उच्च मोलाची आहे. कोंती विजयनगरचा उच्चार ‘बिझनेगलिया' असा करतो. प्रस्तुतचा उतारा' विजयनगर स्मारक ग्रंथ' पृ. २५२ यांतून घेतला आहे. ] [ १९
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/135
Appearance