पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास जनरल ब्रिग्जने एल्फिन्स्टनच्या सूचनेवरून इंग्रजीत चार खंडांत भाषांतर केले आहे. फिरिस्ताच्या ग्रंथांत गजनीच्या सुलतानापासून ते फिरिस्ताच्या समकालीन घडामोडीपर्यंतची हकीकत १२ भागांत आली आहे. वाराव्या भागाचे नांव ' हिंदुस्थानांतील संत' असे आहे. त्याचे भाषांतर ब्रिग्जने केलेले नाही. शेवटच्या पुरवणींत हिंदुस्थानचे हवापाणी व भूगोल यासंबंधी माहिती आहे. फिरिस्ताचें सबंध नांव महम्मद कासीम हिंदुशाह फिरिस्ता. हा कास्पियन समुद्राचे कांठीं अस्तराबाद येथे इ. स. १५७० साली जन्मला. हा तरुणवयांतच वापाबरोबर हिंदुस्थानांत आला. कांहीं दिवस अहमदनगर येथे निजामशाहीत नोकरी केल्यावर ती इ. स. १५८९मध्ये सोडून विजापूरच्या आदिलशाहाचे पदरी नोकरीस राहिला. बेगम सुलतानाचे अकवरपुत्र दानियालबरोबर लग्न झाले. तिला पोंचविण्यासाठी हा खानदेशांत ब-हाणपूरापर्यंत गेला होता. कारण बन्हाणपूर ही मोगलांची दक्षिणेतील राजधानी होती. पुढे अकबराचे मृत्यूनंतर आदिलशाहातर्फे तो जहांगिराकडे दुखवटयाचा संदेश घेऊन गेला व लाहोर येथे त्याने त्याची भेट घेतली. तेथून तो पूर्वेस वहारमधील रोठस मार्गाने दक्षिणेत आला असे दिसते. त्याने एक वेळ बदक्षानपर्यंतहि प्रवास केला होता. त्याच्या मृत्यूचा सन अनिश्चित आहे. परंतु त्याने आपला इतिहास इ. स. १६२४ पर्यंत आणून सोडला आहे. दिल्लीच्या मुख्य राजवंशजांखेरीज इतर छोट्या मुसलमानी राजघराण्यांची हकीकत सांगण्यास फिरिस्ताच्या इतिहासासारखा उपयुक्त आधार उपलब्ध नाहीं. इ. व डौ. व्हॉ. ६ पृ. २०६.] | हिंदूची राजधानी जिंकण्यासाठीं न थांबतां अहमदशाहाने खुल्या प्रदेशावर हल्ला केला. तो जेथे गेला तेथे त्याचा चुलता व पूर्वाधिकारी महम्मदशाह आणि विजयनगरचे राज्य यांच्यात झालेला करार मोडून त्याने पुरुष, स्त्रिया व मुले यांना निर्दयतेने ठार केले. ठार केलेल्यांची संख्या वीस सहस्रांपर्यंत गेली कीं तो तेथे तीन दिवस थांबे आणि या रक्तमय प्रसंगाबद्दल आनंदोत्सव करी. मूत असलेली देवळे त्याने फोडली आणि ब्राह्मणांची महाविद्यालये उध्वस्त केली. या सगळ्या धार्मिक इमारतीचा नाश आणि देवतांचा अपमान झालेला पाहून पांच हजार हिंदूंचा एक गट एकत्र आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की, या दुःखाचे मुळ जा राजा त्याला ठार करण्याचे यत्नांत आपण प्राण अर्पण करू. १८]