पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कोंती सांगतो कीं, नगरचा घेर साठ मैल असून त्याचे तट पर्वताएवढे उंच बांधलेले आहेत. नगरांत शस्त्र धारण करू शकणारी नव्वद सहस्त्र माणसे आहेत. राजाला १२००० स्त्रिया असून मिरवणुकीच्या वेळी त्यांची विशेष व्यवस्था केलेली असे.... ४००० स्त्रिया मोठ्या आकर्षक रीतीने सज्ज होत्सात्या घोड्यांवर आरूढ झालेल्या असत. | तेथील देवाच्या रथाची वाषिक मिरवणूक व त्या वेळी स्वेच्छेने करण्यांत येणारे देहयज्ञ व त्यांचे भिन्न प्रकार; वर्ष प्रतिपदा, महानवमी, दीपावली व होळीचा रंग हे सण व ते साजरे करण्याचे उत्सव, मिरवणुआदि सार्वजनिक प्रकार; कोटचे व्यवहार व न्यायनिवाडा करण्याकरिता अवलंबिण्यांत येणा-या तप्त दिव्यांच्या निरनिराळ्या रीति इत्यादि गोष्टींचे त्याने सविस्तर वर्णन केलेले आहे. लढाईच्या प्रसंगी वापरण्यात येणा-या आयुधांत दगडी गोळे (Ballistae) व भडिमार यंत्रे (Bombardas) यांचा त्याने विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. येथील लोक सर्व युरोपियनांना फ्रँक म्हणून संबोधीत व त्यांच्या अरेरावी वागणुकीमुळे त्यांच्या विषयीं येथे काय समज प्रचलित झाला होता त्याविषयी कोंती लिहिता * आम्ही आम्हालाच मात्र दोन डोळे असून इतर राष्ट्रांतील लोक आध आहेत व हिंदु लोक एकडोळे आहेत असे म्हणतो, कारण आम्ही स्वतः सर्व राष्ट्रांमध्ये शहाणपणांतं श्रेष्ठ आहो असे समजतों अशी आमच्याविषयी त्यांच्यांत बोलवा आहे." विजयनगरचे वैभव [खालील उता-याचा लेखक अबदुल रझ्झाक हा हिरात येथ इ. स. १४१३ जन्मला. हा इराक-तुराणचा वादशाह व तैमूरचा वंशज शाहरुख यांच्यातर्फे वकील म्हणून विजयनगरला इ. स. १४४३ साला आला. त्या वेळीं विजयनगरला दुसरा देवराय राज्य करीत होता. यान तैमूर व शाहरुख यांच्या काळचा इतिहास लिहिला आहे. रझ्झ रझ्झाक हा सुसंस्कृत व राज्यव्यवहार जाणणारा होता. या प्रवासाचे त्यान लिहिलेले वृत्त ‘हॅक्ल्यूइट' मंडळाच्या पंधराव्या शतकांतील हिंदुस्थान २० ]