पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अहमदशाह बहमनी १०१ रात्रीनंतर तो जेवत असे आणि त्या वेळी हे सतरा विद्वान् आपले हात धुऊन त्याच्यासमोर बसत. त्यांच्यापुढे हि जेवणाची ताटे ठेविली जात. आणि त्या प्रसंगी सुलतान भोजन करी, पण सतरा विद्वानांस त्याच्यासमोर भोजनाची मनाई असे. राजाचे जेवण झाले म्हणजे ते आपआपली ताटे घेऊन घरीं जात आणि तेथे जेवीत. कांहीं म्हणतात की, 'आपली प्रकृति चांगली राहावी म्हणून राजा गुप्तपणे दारू पितो.' प्रत्येक कामाची वेळ ठरलेली असे. एकदां सुरू झालेली वहिवाट तो कधींहि बदलत नसे. जर सुलतानाने एखादे पेय किंवा खाद्य पदार्थ एकदां कोणाला दिला असेल तर पुढील भेटींत त्यांत तो फरक करीत नसे. जोनपुरचा एक प्रसिद्ध मनुष्य त्याच्याकडे उन्हाळ्यांत प्रथम आला. त्याने त्यास भोजन प्रसंगीं, थंड वाटावे व तहान भागावी म्हणून सरबताच्या सहा सुरया दिल्या. पुढे जेव्हां तो हिवाळयांत त्याजकडे आला तेव्हांहि त्याच्यापुढे सहा सुरया सरबत आले. सुलतान आपल्या सरदारांशी आणि थोर माणसांशीं प्रथमदर्शनी जसा वागला असेल तसाच अनेक वर्षांनंतरहि वागे. तो मितभाषणी होता. अवांतर गोष्टी टाळून मुद्द्यापुरते बोलत असे. त्याच्या लक्षांत फार जुन्या गोष्टी राहात. त्याच्या कारकीर्दीत एकंदर व्यवहार शांततेने, प्रामाणिकपणाने नि सरधोपटपद्धतीने चालत. अभ्यास :--या उता-यावरून तुम्हांला शिकंदराची जी माहिती मिळते ती पुढील मुद्दयांनुसार लिहा : (१) दिनचर्या, (२) अतिथि-अभ्यागतांश वागणे, (३) भोजन करण्याची रीत. १२ ।। अहमदशाह बहमनी (इ. स. १४२२-१४३४) [प्रस्तुतचा उतारा फिरिस्ता' या विख्यात ग्रंथकाराने लिहिलेल्या तारीख-इ-इब्राहिमी या ग्रंथांतून घेतला आहे. या ग्रंथास ‘नौरसनामा असेहि नांव आहे. विजापूरचा इब्राहिम आदिलशाह याचे पदरों | असतांना फिरिस्ताने हा ग्रंथ लिहून संपविला म्हणून पहिलें नांव पडले. 'नौरसनामा' हे नांव इब्राहिमने इ. स. १५९९ त बांधलेल्या नौरस या नव्या राजधानीच्या नांवावरून पडले. या ग्रंथाचें मेजर | १७