पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४४ , हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास " (सारांश), ही शिकवणूक गीतेच्या अभ्यासकांच्या मनावर निरनिराळ्या प्रकारे ठसविली जाते.....म्हणून मार्ग चुकलेले असले व आपल्या देशाच्या मुक्ततेसाठीं बारींद्र घोष आणि त्याचे सहकारी यांनी युरोपियन क्रांतिकारकांच्या आत्मघातकी मार्गाला भगवद्गीतेच्या पवित्र सिद्धान्ताची जोड देण्यांत विपरीतपणा केला असला तरी त्यांच्या जीवनाची प्रेरणा याच पवित्र ग्रंथांतून मिळालेली आहे. आपणाला त्यांचे मार्ग कितीहि न आवडोत, पण या तरुणांनी आपल्या स्वतःवर आणि इंद्रियांवर विजय मिळविला व बंगाल्याचा स्वभावधर्म म्हणून समजला जाणारा भित्रेपणा नष्ट केला आहे हे नाकारण शक्य नाहीं. ......आम्हांला असे वाटते की या तरुण मंडळींनी आपल्या चुकांनी सुद्धा जगापुढे सिद्ध केले आहे की, हिंदुस्थान भलत्याच मागनि गल तरीसुद्धां तो आपल्या मार्गाने जातो आणि मानवी चुका आणि अपरा यांच्या इतिहासांतहि नवीनता निर्माण करतो. अभ्यास :-दहा भारतीय क्रांतिकारकांची नांवें सांगा. ५६ : हिंदुस्थान सरकारांत जबाबदारीचा प्रव। (इ. स. १९१९) | [ इ. स. १९१९ च्या कायद्याची उद्देशपत्रिका ही २० ऑगस्ट * १९१७ रोजी भारतमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर आधारलेली आहे दोहोंतील शब्दयोजना अत्यंत काळजीपूर्वक केलेली आहे. हिंदुस्थानात जबाबदार राज्यपद्धतीचा प्रवेश या घोषणेने झाला. वरील उद्द, पत्रिकेतील मुख्य भाग पुढे दिला आहे-बानर्जी भा. २ रा, पृ. २४°! ज्या अर्थी पार्लमेंटचे असे धोरण आहे कीं, ब्रिटिश हिंदुस्थाना लोकांचा राज्यकारभाराच्या अनेक शाखांतून वाढत्या प्रमाणांत अ करावा, तसेच देशांतील स्वायत्त संस्थांचा क्रमाक्रमाने विकास करावा, की, त्या योगे ब्रिटिश हिंदुस्थान हे साम्राज्याचा अंगभूत घटक । त्याबरोबरच तेथे जबाबदार राज्यपद्धति क्रमशः वाढीस लागावी, ९० ] Tणांत अंतर्भाव त घटक राहून