पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थान सरकारांत जबाबदारीचा प्रवेश ३४५ | आणि ज्या अर्थी या धोरणाने होणारी प्रगति टप्याटप्यानेच होत राहाणार, तसेच या प्रगतीचा पहिला हप्ता ताबडतोब अंमलात आणणें हें | ज्या अर्थी आज अवश्य आहे..... आणि ज्या अर्थी या देशांत होणारी घटनात्मक प्रगति किती वेळांत व कोणत्या त-हेने होईल हे पार्लमेंटनेच ठरविणे इष्ट आहे, कारण पार्लमेंटच जनतेच्या प्रगतीबद्दल व कल्याणाबद्दल शेवटी जबाबदार आहे, आणि ज्या अर्थी हिंदुस्थानांतील लोक या नव्या प्रयोगांत कितपत सहकार्य करतील व त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा व जबाबदारीचा ते कितपत उपयोग करून घेतात यावरच पार्लमेंटला सुधारणांचे हक्क देतांना अवलंबून रहावे लागेल, आणि ज्या अर्थी प्रान्तांतून स्वायत्त संस्थांची वाढ होत असतां प्रांतिक सरकारांना वरिष्ठ सरकारपासून शक्यतों अधिक स्वातंत्र्य देणे इष्ट ठरेल, पण त्याबरोबरच वरिष्ठ सरकारलाहि आपल्या जबाबदा-या नीट पार पांडण्याची सत्ता राहील अशी योजना तयार करावी लागेल. । त्या अर्थी असा कायदा केला जातो की, (यापुढे कायद्याची कलमें सुरू) अभ्यास :-इ. स. १९१९ सालीं पास झालेल्या द्विदल राज्यपद्धतीचा कायदा व त्याची अम्मलबजावणी हीं वरील उद्देशपत्रिकेशी कितपत सुसंगत होती याचे विवेचन करा. [९१