पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीगोता आणि बॉम्ब ३४३ असावा याचे रहस्य इंग्रज माणसासच काय पण आंग्लविद्या विभूषित हिंदूलासुद्धा कळणे शक्य आहे असे आम्हांस वाटत नाहीं....हे कोणाच्या ध्यानीं आलेले दिसत नाहीं कीं..युरोपियन क्रांतिकारकांच्या पद्धतींत गीतेच्या थोर ध्यात्मिक शिकवणीचा समावेश झाल्यानेच बंगाली क्रांतिकारक व त्याच वळणाचे युरोपियन क्रांतिकारक यांच्यांतील भेद स्पष्ट होत आहे.......। बरोबर अथवा चुकीने 'बंगाली लोक हे भित्रे' असे अनेक वर्षे सांगण्यांत येत आहे.... त्यामुळे त्यांना भारतीय सैन्यांत प्रवेशहि (देण्यांत येत) नाहीं ......हळूहळू भित्रेपणा ( Timidity ) हे वंगाली लोकांचे वैशिष्ट्य समजले जाऊ लागले आहे. भित्रेपणा म्हणजे संस्कृतमध्ये कार्पण्य. ‘कृपण' या शब्दाचा औपनिषदिक अर्थ असा आहे कीं 'शरीरापासून आत्मा पूर्णपणे भिन्न आहे हे ज्याला कळत नाहीं तो. नाशाची किंवा मृत्यूची भीति वाटण्याचे मुख्य कारण.....( आत्मा व शरीर भिन्न आहे')या तत्त्वाचे अज्ञान व विवेक बुद्धीचा अभाव....आपल्या समोर सगेसोयरे युद्धाला उभे ठाकलेले पाहून या कार्पण्याने (भित्रेपणाने) अर्जुनाला पछाडले ••....म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला; * कापर्य्यदोषोपहतः स्वभावः •... म्हणजे भीतीने माझी स्वाभाविक वृत्ति नष्ट झाल्याने मी तुम्हाला विचारीत आहे.....जे निश्चयें करून श्रेयस्कर असेल ते (माझे कर्तव्य) मला सांगा........श्रीकृष्णांनी सांगितले की " असे पहा की मी (पूर्वी) कधी नव्हतों असें तर नाहींच, तू व हे राजे (पूर्वी) नव्हते असे नाही. आणि आपण सर्व यापुढे होणार नाहीं असेंहि नाहीं. | देह धारण करणारास या देहांत ज्याप्रमाणे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण (प्राप्त होते ), त्याप्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत (मृत्यूच्या बाबतींत)ज्ञानी पुरुष मोह पावत नाहींत. नित्य, अविनाशी व अचित्य असा जो शरीराचा मालक (आत्मा) त्याला प्राप्त होणारे हे देह किंवा शरीरें नाशवंत म्हणजे अनित्य होत, असे म्हटले आहे. म्हणून हे भारता ! तु युद्ध कर ! ".... म्हणजे मूळची चित्शवित अमर आहे, आत्मा अविनाशी आहे. रोग, दुःख, मृत्यु या गोष्टी नाशवंत आहेत. २२ सा. इ. • [८९