पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारराव गायकवाड बडतर्फ ३२१ ४४ । । । मल्हारराव गायकवाड बडतर्फ [ हिंदुस्थान सरकारचा जाहीरनामा, १९ एप्रिल १८७५. मुकर्जी ५८३।५८४] संबंधित अशा सर्वास :- वडोदे संस्थानांतील ब्रिटिश सरकारचे माजी प्रतिनिधि कर्नल फेयर ता. वी. यांवर विषप्रयोग करण्याच्या प्रयत्नाला महाराजांनी प्रोत्साहन दिले १ आरोपाच्या सत्यत्वाबद्दल चौकशी करता यावी आणि महाराजांना या आरोपांतून सोडवणूक करून घेण्याची प्रत्येक संधि दिली जावी म्हणून ब्रिटिश सरकारने राजे मल्हारराव गायकवाड यांना आपल्या अधिकाराची अंमल जावणी करण्यास तात्पुरता प्रतिबंध करून बडोदा संस्थानचा राज्यकारभार तात्पुरती आपल्या हाती घेतला आहे. चौकशी मंडळाने कामकाज संपविल्यानंतर महाराणीसाहेबांच्या सरकारने बडोदा संस्थानची राज्यसूत्रे मल्हारराव होळकर यांचे हातांत चावीत की नाही याचा विचार केलेला आहे. | चौकशीमंडळामध्ये मतभेद झाल्याकारणाने महाराणीसाहेबांचे सरकारने कापला निर्णय चौकशी मंडळाची चौकशी वा अहवाल यांवर आधारलेला नाही किंवा चौकशीचा निर्णय राजेसाहेबांवरील आरोपाची सत्यता सिद्ध करतो असेहि गृहीत धरलेले नाहीं. राजे मल्हारराव गायकवाड यांची कुप्रसिद्ध गैरवर्तणूक, संस्थानच्या राज्यकारभारांतील अव्यवस्था, आवश्यक सुधारणा घडवून आणण्याच्या कमांतील त्यांची दिसून आलेली अपात्रता आणि मल्हारराव गादीवर आल्यापासून आतापर्यंत बडोद्याच्या कारभारासंबंधी सर्व प्रसंग ध्यानात आणून तसेच राजेसाहेबांस पुन्हा सत्ताधिष्ठित करणे बडोद्याच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने घातक ठरेल व वडोदे संस्थान व ब्रिटिश सरकार यांमध्ये के संबंध राहणे अवश्य आहे ते टिकविण्याचे दृष्टीने विसंगत होईल म्हणून महाराणीसाहेबांचे सरकारने असा निर्णय घेतला आहे कीं, राजे मल्हारराव यांना बडोद्याच्या सार्वभौमपदावरून काढून टाकण्यात येईल आणि ते व [ ६७