पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास | आमचा एक धनी वनारजी नामें पारशी गृहस्थ होता. त्याचा दारूचा पिठ्ठा असून, त्यावर कोठे साफसूफ करणे, दारूचे पेले ध” वगैरे जे जे काम तो मला सांगे तें तें मी लक्ष लावून करीत असे. त्याला दोन मुलगे होते. पुढे ते स्टेशनवर फिटर असतां कांहीं दिवस त्यांचा फराळाचा डबा पोचविण्याचे काम करीत असे. त्याबद्दल मला ३ रु. मिळत. तेव्हां स्वस्ताई असल्याकारणाने मला माझे पोटाला पुरण्याजोगते हैं उत्पन्न होते. साधारणपणे त्या वेळचा बाजरीचा भाव २ रुपये फरा, तांदूळ ३।४ रुपये फरा (पन्याचा हिशोब मुंवईमापी १६ व देशरानच्या ८ पायल्या आहे) असे; व दूध, तूप तेल अनुक्रमे १ रुपयास ८ शेर, १॥ शेर व ८ शेर होते. भायखळ्याच्या वाजूला तर त्या वेळीं वस्तीहि झालेली नव्हती; त्यामुळे सोबत करून राह म्हणजेच घरभाड्यादाखल समजले जाई. | मला येथे मिशनरी लोकांच्या उद्योगप्रियतेबद्दल मोठी प्रशंसा करावीशी वाटते. याचे कारण त्यांनी मोठे धाडस करून व संकटे सोसून आणि नाना देशाटने करून येथील लोकांची व एकंदर परिस्थितीची माहिती करून घेतला, व एतद्देशीय भाषांचे ज्ञान संपादन करून घेऊन त्यांनी ते आपल्या राष्ट्रात नेऊन पसरिलें. त्यांच्या उद्योगामुळेच जगांतील अनेक भाषांचे टाईप । छापखाने प्रथम सुरू झाले असे म्हणण्यास हरकत नाही. याचे कारण त्याचा ख्रिस्ती धर्मप्रसाराची तळमळ व त्यासाठी वेगवेगळ्या भाषांतून बायबल छापून प्रसिद्ध करण्याचे वेड हे होय. पण त्यामुळे आम्हांस मात्र एक फायदा झाला. आमचे देशांत छापण्याची कला नवीन आल्यामुळे आम्हांसहि आमच वेद, ग्रंथ, पुराणे, शास्त्रे, कला, काव्ये इत्यादि छापून काढतां आलीं. | मी जावजीच्या* टाईप फाउंड्रींत असतांना मला स्वतःला पंच घासण्या विषयींचा फार निदिध्यास लागला होता. पण या फाउंड्रींत मला । कामेंन फार असल्यामुळे फारसा वेळ मिळत नसे; व म्हणून मी पंच घासण्या काम स्वयंस्फूर्तीनिं घरीच करू लागलो. मला या गोष्टीची संथा माझा आद्य गुरु टॉमस ग्राहाम याचेपासुन प्रथम मिळाली. खरोखर हा त्याचा मजवर मा

  • * निर्णयसागर' टाइपफौंडरी व प्रेसचे मूळ मालक.

६२]