________________
बंड व विद्वत्ता: १८५९ मधील ज्ञानप्रकाशाचे मत ३१७ प्रसाद होय; व पुढे पुढे मी त्याचे स्मरण करून आपले काम येईल तसतसे करू लागलो. यानंतर मला कामानेच शिकविलें म्हटले तरी चालेल. । ज्याप्रमाणे महाभारतांत एकलव्य नामक व्यावाने द्रोणाचार्यास आपला मनोमय गुरु करून धनुर्विद्येत त्यांचा प्रसाद ग्हणून प्रावीण्य मिळविले, त्याचप्रमाणे मीहि दॉमस यास मनोमय गरु करून या विद्येत प्रावीण्य संपादन केले. पंच घासण्याच्या कामाची मला पुढे पुढे इनकी गोडी लागली की चाल नोकरी सोडून केवळ पंच करण्याचाच अभ्यास वाढावा म्हणून मी इ. स. १८६९ सालीं जावजीची नोकरी सोडून मुंबई समाचार नांवाच्या पारशाच्या छापखान्यांत ३० रुपयांच्या जागेवर आपला प्रवेश करून घेतला. येथे मी सुमारे वर्षसहा महिने असेन. तितक्या अवधीत मी टाईप पाडणे, घासणे, मेट्रिसा फिट करणे वगैरे कामावरच होतो. पण मला माझ्या आवडीची वस्तु जी मंच करणे त्यास वेळ मिळेना म्हणून मी तेथीलहि नोकरी सोडून पुण्यास ज्ञानप्रकाश छापखान्यांत टाईप फाडींत नोकरी धरली. सन १८७१ मध्ये मला येथे दरमहा २० रु. पगार होता, तरी मला येथे काम शिकण्यास मिळेल म्हणून तेवढ्यावरहि राहाण्यास मी तयार झालों. अभ्यास :--१. अर्वाचीन युगांतील नवे धंदे सुरू करणारांची चरित्रे जमवा. २. त्या वेळचे पगार व बाजारभाव यांची सद्यःस्थितीशी तुलना करा. लाड मेयोचा खून हिंदु पेट्रियट पत्राचा अग्रलेख } { २६ फेब्रुवारी १८७२ [ इंग्रजी राज्यांत वृत्तपत्रांवर पुष्कळ वेळी नियंत्रणे असत. कित्येक वेळां राज्यकत्र्यास सावधगिरीचा इषारा देतांना मोठ्या कुशलतेने आपले विचार प्रकट करावे लागत. प्रस्तुत छोटा उतारा तत्कालीन संपादकीय करामतीचा एक नमुना म्हणून पुढे दिला आहे. मुजुमदार, पृ.९३] | इंग्रजांच्या शिस्तशीर राज्यांत आपल्या महत्त्वाकांक्षेस आतां वाव उरला नाही म्हणून कांहीं असंतुष्ट आत्मे हळहळत असतील. या राज्यांत वाघ आणखी गाय (आपला वैरभाव विसरून) एकाच ओढ्यावर पाणी [६३