Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राणू रावजीची आत्मकथा : मुद्रणाच्या पहिल्या धडपडो ३१५ प्रोत्साहन देणे आणि हिंदुस्थानांतील आमच्या प्रजाजनांच्या फायद्यासाठीच हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविणे अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यांचा उत्कर्ष हेच आमचे सामर्थ्य, त्यांचे समाधान हेच आमचे संरक्षण व त्यांची कृतज्ञता हेच आमचे सर्वोत्कृष्ट बक्षीस होय ! आणि आमच्या लोकांच्या हितासाठीच आमच्या इच्छा शेवटास नेण्याचे सामर्थ्य आम्हाला ब आमच्या हाताखालील अधिकारी वर्गाला तो सर्वशक्तिमान ईश्वर देवो ही प्रार्थना ! | अभ्यास :--१ सत्तावनच्या दंगलीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी काढलेला हा जाहीरनामा या दृष्टीने त्याचे पृथक्करण करा. २' हा जाहीरनामा सुराज्याचे आश्वासन आहे, स्वराज्याचे नव्हे' विवेचन करा. राणू रावजीची आत्मकथा : - मुद्रणाच्या पहिल्या धडपडी | [ कै. राणू रावजी आरू (इ. स. १८४८-१९२२ ) हे नामांकित पंचीगार ऊर्फ पंचमेकर होऊन गेले. त्यांचे चरित्र मुंबईच्या छापखान्याच्या धंद्याशी निगडीत झाले आहे. त्यांनी जी आत्म-कथा निवेदन केली ती श्री. दत्तशर्मा देवधर यांनी लिहून काढली; ती पृणे मुद्रकसंघातर्फे प्रसिद्ध होणा-या “ मुद्रण प्रकाश " या नियतकालिकांत (वर्ष १ लें। अंक १।२ मध्ये) इ.स. १९३८ सालीं प्रसिद्ध झाली. त्यांतून अंक १ पृ.१३-१४ व अंक २ पृ.६५-६६ वरून पुढील उतारे घेतले आहेत.] १८५७ सालच्या बंडाच्या वेळी आमचे आळे हे होळकर शाहीचे गांव इंग्रजांनी आपले तान्यांत घेतले. त्या वेळचे धांगडधिंग्यामुळे आमची फारच गंमत उडे. आम्ही रानावनांत गुरे वळण्यास गेलो असतां सोजीर पाहिला की ते धरतील सवरतील या भीतीने आम्ही दडत असे. पण, ईश्वरकृपेनें या संकटांतून आम्ही लवकरच मुवत झालों ! कारण तीनच दिवसांनंतर सर्वत्र स्थिरस्थावर झाले.