पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वॉरन हेस्टिग्जची चौकशी २४५ त्यांच्यापासून हिरावून घेऊन त्या दुष्ट माणसांस देऊन टाकल्या असा माझा । आरोप आहे. एका अल्पवयी राजाला त्याच्या पालकापासून तोडून त्याला देवीसिंग । नांवाच्या दुष्ट जमीनदाराच्या ताव्यांत दिले असा माझा आरोप आहे. याच देवीसिंगाचा दुष्टपणा सर्वत्र जगजाहीर असतांना तीन मोठ्या प्रांतांची व्यवस्था हेस्टिग्जने त्याच्याकडे दिली यामुळे देश उध्वस्त झाला जमीनदार नष्ट झाले, शेतकरी संत्रस्त झाले, त्यांच्या घराची जाळपोळ झाली, पिके कापून नेलीं व अनेकांस क्रूर शिक्षा दिल्या, व त्या देशांतील स्त्री जातीची इज्जत घेतली असा माझा त्याच्यावर आरोप आहे. | सदगृहस्थ हो ! इंग्लंडच्या कॉमन्सतर्फे मी आपणांस असे विनवून विचारतों कीं, हिंदुस्थानांतील नागावलेल्या राजांचे, नष्टचर्य ओढवलेल्या स्त्रियांचे व बेचिराख झालेल्या प्रदेशांचे वाली म्हणून उभे राहून तुम्ही त्यांचा कैपक्ष घेणार की नाही ? पुन्हा एकवार वॉरन हेस्टिग्जवरील माझे आरोप मी समजावून सांगतों: त्यानें भयंकर गुन्हे व दुर्वर्तणूक केलेली आहे. पार्लमेंटने त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा घात केलेला आहे. इंग्रज राष्ट्राचे नांव व त्याचे शील यास काळिमा आणलेला आहे. हिंदुस्थानांतील लोकांचे कायदे, हक्क व स्वातंत्र्य यास त्याने तिलांजलि | दिली, मालमत्ता नष्ट केली व देश उध्वस्त केला. या जगांतील शाश्वत न्यायाची तत्त्वे त्याने झुगारून दिली. सात्त्विक मानवी प्रवृत्तीवर त्याने आघात केला. स्त्री व पुरुष यांच्या अब्रूची चाड ठेविली नाहीं व असे करतांना कुणाचेहि वय, दर्जा, अधिकार व परिस्थिति हों लक्षात घेतली नाहींत." । - अभ्यास :-वरील भाषण वक्तृत्वाच्या दृष्टीने परिणामकारक असले तरी कायद्याच्या दृष्टीने त्यांतील आरोप कसे अतिव्याप्त आहेत ते लक्षांत घ्या. [ ३१