पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास वॉरन हेस्टिग्जची चौकशी [ हेस्टिग्ज़ हिंदुस्थानांतुन परत गेल्यावर त्याच्या कारभाराची पार्लमेंटपुढे चौकशी झाली हैं प्रसिद्ध आहे. या प्रसंगी एडमंड बर्कने केलेले भाषण अठराव्या शतकांतील वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून समजले जाते. ता. १५ ते १९ फेब्रुवारी १७८८ असे पांच दिवस हे भाषण चालू होते. भाषणांत ब्रिटिश घटनेचा अभिमान, हक्क संरक्षणाचा आग्रह न्यायाची तरफदारी, मूलभूत मानवधर्मास आवाहन व हिंदुस्थानच्या गांजलेल्या जनतेबद्दलचा कळवळा ही सर्व ओतप्रोत भरलेली आहेत. निवडक ठसकेदार शंब्द व भानवांचे आरोह अवरोह यांची खरी प्रचिती ते भाषण मूळांतून स्वतःशीच मोठ्याने वाचल्याने येऊ शकेल. त्यांतील मुद्याचा निवडक भाग पुढे दिला आहे. कीथ, १५०-५१] म्हणून मी हेस्टिग्जवर असा आरोप करतों की, त्याने ख़ाजगी हितासाठी सहा प्रान्तिक मंडळांच्या साह्याने चाललेली राज्यरचना साफ मोडून टाकला असे करण्याचा त्याला अधिकार नव्हता. | एकंदर राज्याचा योग्य कारभार करण्यास पार्लमेंटने त्याच्या हाती । अधिकार दिलेले होते त्या अधिकारांचा वापर त्याने दुसन्यास बेकायदेशी रीत्या करू दिला.

  • राज्यांतील दिवाणाच्या जागी त्याने असा मनुष्य नेमला की, कंपनीच्या मताने तसेच उपलब्ध सरकारी कागदपत्रांवरून व इतर अन बाजूनीं सर्वाच्या तिरस्कारास पात्र झालेला व नांव बद्द् झालेला असा हात त्याच्या हाती कारभार देऊन हेस्टिग्जने इंग्रज लोकांस त्याच्या हातची बाहुल बनविलीं. अशा रीतीने मध्यवर्ती व प्रांतिक कौन्सिलांनों करावयाचा कारभा त्याने त्यांच्या हातून गैरकायदा काढून घेतला.

| गंगा गोविंदसिंगापासून त्याने लांच स्वीकारली असा माझा आ आहे. ज्या इतर लोकांपासून त्याने लांच घेतली, त्यांना नागविले असा मा आरोप आहे. विधवांची संपत्ति त्यांच्यापासून कगटाने हिरावून घेतली असा मा आरोप आहे. गरीब अनाथांच्या जमिनी कांहीं एक हक्क किंवा अधिकार नसत ३० ]