पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १९ । । :: पिटस इंडिया अॅक्टा'चा उद्देश | [ पिटचे हाऊस ऑफ कॉमन्समधील भाषण. ६ जुलै १७८४ निवडक उतारे. बानर्जी पृ. ७८] | हिंदुस्थानांतील आपला कारभार पाहाण्यास तेथे जाग्यावरच एक सत्ता धारी सरकाराची आवश्यकता आहे, मात्र ते सरकार आपल्या देशाच्या सरकारापासून स्वतंत्र असे असता कामा नये. आपण येथून जे हुकूम पाठवू ते हुकूम त्यांनी पाळलेच पाहिजेत. परंतु त्यावरोबरच हिंदुस्थानांत कसलाहि जुलूम होणार नाहीं व महत्त्वाकांक्षी लोकांची अरेरावी चालणार नाही याबद्दलहि त्या सरकारने काळजी घेतली पाहिजे. आपला मुख्य उद्देश तेथे व्यापार सुरळीत चालावा हा आहे व लोकांत शांतता व सौख्य नांदल्याखेरीज हे साध्य होणे शक्य नाहीं. व्यापाराचा सर्व व्यवहार मात्र आज चालू आहे त्याप्रमाणे कंपनीच्या हातांत राहू देणे इष्ट आहे. व्यापारी कंपनीला साम्राज्यावर राज्य करता येईल का असा प्रश्न कधी कधी विचारला जातो. या प्रश्नाचे तात्त्विक उतर कसेंहि असा. प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र या प्रश्नास निराळेच उत्तर देणारा पुरावा उपलव्य आहे. ईस्ट इंडिया कंपनीने कित्येक वर्षांपर्यंत व्यापारहि चालवला व साम्रा ज्यावर अंमलहि केला. ही ई. ई. कंपनी म्हणजे कांहीं नवेंच मंडळ नव्ह पार्लमेंटच्या कायद्याने व सनदांनीं त्या कंपनीला कांहीं हक्क प्राप्त झाले. या हक्कांची अंमलबजावणी करीत करीतच कंपनी लहानाची मोठी झाला: कंपनीचे हे हक्क पवित्र असून त्यावर अतिक्रमण होता कामा नये हे जितक खरें, तितकेच कालाच्या ओघांत किंवा एखादा नवा बनाव घडल्याने जर त्या हक्कोपभोगामुळे जनतेचे सार्वजनिक नुकसान होत असेल तर त्या हक्काच अतःपर समर्थन करतां येणार नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे......। ( वर सांगितल्याप्रमाणे राज्याच्या कारभाराची देखरेख व ताबा बाई कडे सोपवावा व व्यापाराचा व्यवहार कंपनीने पहावा. आतां हिंदुस्थान राज्यकारभारांत जे कित्येक अधिकारी लागतील त्यांची नेमणूक का करावयाची हा प्रश्न आहे. माझ्या मते हा अधिकार बोर्डाच्या कक्षबाट ठेवावा व कोणाच्याहि हातांत तो असो त्यासंबंधी यापुढे आपण इतके नि | ३२] -