Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८३ पहिल्या इंग्रज-मराठे युद्धांत हेस्टिग्जचे अंग येऊन पोहोचण्यापूर्वी युद्ध संपल्याची बातमी मिळेल. पण ती न मिळाली तर तुम्हीं असे समजावें कीं, युद्ध पुढील सालपर्यंत लांबलें व बंगाल सरकारने मुंबईकडे सर्व प्रकारे मदत पाठविण्याची आवश्यकता आहे. कंपनीच्या कारभाराची एकंदर स्थिति याहून वेगळी वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाहीं. कंपनीच्या या कारभारावर अखेरचो हुकमत कोणाची हे एकदां ठरवून दिले पाहिजे. म्हणजे त्या अधिका-यास प्रस्तुतच्या 'बकट अवस्थेतून मार्ग काढतां येईल व योग्य ते उपाय योजतां येतील. जनरल कलेव्हरंग, कर्नल मॉन्सन व मि. परेंन्सिस यांच्या आतापर्यंतच्या वागणुकीवरून ते असा अधिकार हाती घेण्यास पात्र आहेत असे दिसत नाहीं. तथापि आज चालू आहे या परिस्थितीपेक्षा सर्व कारभार त्यांच्या हाती सोपविला तरी अधिक बरे होईल. जोपर्यंत राज्यकारभारांतील प्रत्येक प्रश्नावर पक्षपक्षांची वादांचीं रणे माजणार तोपर्यंत कुणाला कसलाहि अधिकर दिला तरी त्यास आपल्या उपाययोजना तडीस नेण्यास कठिणच जाईल. | [ येथून पुढे हेस्टिग्जने कलकत्त्याचे सुप्रीम कोर्ट व त्याचा न्यायाधीश | सर एलिजा इंपे याचेविषयीं मजकूर लिहिला आहे. ] अभ्यास :--१. कलकत्याहून लंडनला पत्र पोहोचण्यास व उत्तर येण्यास तेव्हां किती दिवस लागत ? २. इंग्रजांच्या एकजुटीच्या पाठिंव्याने राघोबास अधिक साथीदार मिळाले असते असे तुम्हांस वाटते का ? ३. साष्टी काबीज करणे इंग्रजांस आवश्यक कां व न्याय्य कसे ? [ २९