पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। २६८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास होती. शिधासामुग्रीहि कशी तरी मिळाली. यामुळे तेथे रोगराई सुरू होऊन त्यामुळेहि कांहीं जण मृत्यु पावले. कलकत्ता काबीज झाल्यामुळे बंगालभर परसलेल्या इंग्रजांच्या वखारीचा सर्वस्वी नाग झाला. आतां या राज्यांत त्यांची एकहि वखार नाहीं. इतक दिवसांत यूरोपांतून (इंग्लंडमधून) फक्त एकच जहाज त्यांच्या सहाय्याथ येऊन पोहोंचलें. कर्नाटकच्या किना-याहून सहा जहाजांचे एक आरमार व काळ्या गोयांची एक पलटण ऑटोवर १४ ला निघाली असून ते सर्व लवकरच कलकत्त्यास पोहोंचतील अशी कल्पना आहे. त्याप्रमाणे सर्व घडून आले तर इंग्रज कलकत्ता परत घेऊ शकतील यात शंका नाही. कारण कलकत्त्यात मुसलमानांची शिबंदी अगदी थोडी आहे; पण एवढ्याने ते या विपत्ता तून कितपत सांवरतील व नवाबाच्या मोठ्या फौजेपासून कलकत्त्याचे संरक्षण कितपत करू शकतील याची मोठी शंका आहे. अभ्यास :–या पत्रांतील कांहीं भाग ऐकीव माहितीवर आधारलेला आहे हे सिद्ध करण्यास अंतर्गत पुरावे द्या.' १०। । । प्लासीची लढाई व तिचे परिणाम [ कर्नल क्लाइव्हचा ‘डायरेवटर्सच्या सिक्रेट कमिटीस' खलिता ता. २६ जुलै १७५७.-मूर, ५३.] - मी आपणांस चंद्रनगर घेतल्याची हकीकत लिहिलीच आहे. आज आपणास फारच महत्त्वाची--नवाव सिराज उद्दौला पदच्युत होऊन मा जाफर गादीवर आल्याची--हकीकत कळवीत आहे. सिराज उद्दौला तहान अटी मान्य करण्यास टंगळमंगळ करीत असे हे मी लिहिलेच आहे. शिवाय आमचा नाश करण्यासाठी त्याचे फ्रेंचांशींहि संधान होते असे ५५ आले. याच सुमारास त्याचे कांहीं वड़े कारभारी त्याला पदच्युत करण्या संबंधी आमच्याकडे कारस्थानार्थ आले. त्यांत वक्षी मीरजाफर हा प्रभु होता. सिराज उद्दौला जितका अप्रिय तितकाच हा जनतेत प्रिय आहे १४]