पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६९ प्लासीची लढाई व तिचे परिणाम सिराजबद्दल सर्वत्र असंतोष आहे याचा अंदाज घेऊन आम्ही मीर जाफरच्या डोक्यावर नवाबीचा मंदील चढविण्याचा मनसुवा केला. सर्व तयारी अगदी गुप्ततेने केली व तारीख १३ रोजी एक हजार यूरोपियन, बाराशें शिपाई आणि आठ तोफा घेऊन आम्ही चंद्रनगरहून निघालों व १८ तारखेस कटवा येथे पोहोंचलों. ते ठिकाण आमच्या सहज हाती आलें. तारीख २२ रोजी सायंकाळीं नदी ओलांडून कासीम बाझारच्या बेटांत प्लासी येथील राईत पहाटे १ वाजतां येऊन पोहोंचलों. सकाळीं नवादाचे १५ हजार घोडेस्वार, ३५ हजार पायदळ व ४० तोफा असे पायदळ आमच्याकडे चाल करून येत असलेले आम्ही पाहिले. सकाळी ६ला त्यांनी तोफांच्या सहाय्याने आम्हांवर हल्ला सुरू केला. परंतु आम्हीं नदीतीरावरील मातीची दरड पाहून तेथे आश्रय घेतला असल्याने शत्रचा हल्ला नीट लागं पडला नाही. यांचेवर हल्ला करणे आम्हांस अशक्य होते. कारण ते आमच्या भोंवतीं सर्वत्र विस्कळीत रीतीने पसरले होते म्हणून रात्रीं शत्रु छावणीत गेल्यावर तेथे हल्ला करावा असा विचार ठरवून आम्ही स्वस्थ राहिलो. दुपारीं शत्रूने आपला तोफखाना मागे घेऊन विश्रांतिस्तव छावणीत गेले. आम्ही लागलीच शिपायांची एक तुकडो दोन, तोफा बरोबर देऊन तिकडे पाठविली. आम्हांपासून सुमारे ३०० यार्ड अंतरावर वरच्या बाजूस एक तळे होते. तेथून शत्रनें फ्रेंच शिपायांच्या सहाय्यानें तोफांची मारगिरी करून आम्हांस बराच त्रास दिला होता. या मोक्याच्या जागेपासून शत्रूला हाकलावे एवढाच आमचा उद्देश होता. आमची तुकडी जातांच ते तेथून बाहेर पडले व आम्ही तेथे जाऊन बसलों शत्रूचे आमचे उच्चाटन करण्याचे लक्षण कांहीं दिसेना म्हणून आम्ही एवढ्यावरच न थांबता आणखी दोन तीन उंचावरच्या जागा लगोलग ताव्यांत घेण्याचे ठरविलें कारण त्याहि मोक्याच्या होत्या. आम्ही पुढे जातांच त्यांनी आपला तोफखाना चालू करण्याचा यत्न केला. पण आमच्या तोफांनीं ऐसी छान कामगिरी बजाविलो कीं शत्रुस मागे परतावे लागले. या वेळी त्यांचे घोडदळ उघड्यावर पडले होते. तेव्हा आम्ही त्याच्यावर मारा करून कित्येक मारले. या गर्दीत ४-५ वडे अधिकारीहि मारले गेले. यामुळे शत्रुसैन्य नामोहरम होऊन त्यांच्यांत एकच गोंधळ पसरला. त्याबरोबर आम्हांस उमेद चढून • आम्हीं वरील मोक्याच्या जागा संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले, [ १५