Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। कलकत्याची अंधारकोठडी २६७ कुणाच्या इच्छेची किंवा अपेक्षेची पर्वा न करतां सिराजउद्दौला हा आपला आजोबा अलिवर्दीखान याच्यामागून बंगालचा नबाब झाला (एप्रिल १७५६). इंग्रजांनी आपल्या उद्दामपणाने त्याच्या शत्रूस आश्रय देऊन त्याला चिडविले होते. यामुळे निकरावर येऊन त्याने या प्रकारचा सूड घेण्याचे ठरविले व इंग्रजांचे मुख्य ठाणे जे कलकत्ता त्यास वेढा घालण्यासाठी मोठे सैन्य पाठविले. इंग्रज आपल्या ऐटींत अशा भ्रमांत राहिले कीं, मुसलमान इकडे येणारच नाहींत. यामुळे ते प्रत्यक्ष येऊन पोहोंचल्याबरोबर सर्व जण अगदी गांगरून गेले व एरवीं त्यांना जे सज़ करतां आलें असतें तेंहि ते करू शकले नाहींत. जवळ चांगले ६०० गोरे शिपाई असून, भरपूर दारुगोळा असून व बळकट किल्ल्यांत स्वतःचे आसन स्थिर असतांहि त्यांनी मुळीं नबाबाचे सैन्य आल्याबरोबर कांहीं प्रतिकारच केला नाहीं. खुद्द गव्हर्नर मि. ड्रेक, सैन्याचे अधिकारी, मोठमोठे कामगार व स्त्रिया, बंदरांत नांगरून पडलेल्या जहाजावर आश्वयार्थ पळून गेले. मागे जे थोडे शिपाई राहिले त्यांना कोणी नेता नसल्याने सर्वत्र बेबंदशाही माजली. अखेर तारीख २० रोजी तिसरें प्रहरी, म्हणजे तीन दिवसांच्या वेढ्यानंतर किल्ल्यावर शरणागतीचे पांढरें निशाण लावण्यांत आले.परंतु ही सर्व व्यवस्था जाहीर होण्यापूर्वीच मुसलमान किल्ल्यांत शिरले तेव्हां कांहींनी त्याचा प्रतिकार केला. ते मारले गेले. नबाबाच्या फौजेने तेथे मनस्वी लूट केली कारण इंग्रजांनी पळून जातांना आपला खजिनाहि बरोबर नेला नव्हता. येथून पुढील अनर्थास सुरुवात झाली. मुसलमानांच्या हाती जे २०० लोक सांपडले त्या सर्वांना एका गुदामांत रात्रभर कोंडून ठेवले व अर्थात् तेथे ते गुदमरून मेले. त्यांतून जे वांचले त्यांना विशेषतः त्यांतील अधिका-यांनी हातकड्या घालून बंगालची राजधानी मुर्शिदाबाद येथे नेलें व कांहीं दिवसांनी त्यांना (आमच्याकडे) मोठ्या केविलवाण्या स्थितीत परत पाठवून दिले. आम्ही शक्य त्या प्रयत्नांनी त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला. जहाजांकडे पळून जाऊन ज्यांनी जीव बचावण्याचा प्रयत्न केला त्यांचीहि दुर्दशा झाली. कसेबसे ते आपल्या जहाजांतून नदीच्या तोंडापर्यंत आले. पावसाळ्याचे दिवस होते. हवा मोठी बाईट पडली होती. बायकामुलांची एकच गर्दी झाली