पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







विघटना



सप्तशृंखला :
 कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी 'मध्ययुगीन भारत' या नावाने भारताचा, इ. स. ६०० ते इ. स. १२०० या कालविभागाचा, त्रिखंडात्मक इतिहास लिहिला आहे. त्यातील तिसऱ्या खंडाला त्यांनी 'हिंदु भारताचा अंत' असे नाव दिले आहे. त्यातील तिसऱ्या भागातील शेवटच्या शेवटच्या प्रकरणांची नांवे 'अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद', 'कनोज व बनारस यांचा उच्छेद', 'उत्तर हिंदुस्थानातील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद', अशी आहेत. इ. स. १२०० ही त्यांच्या कालखंडाची म्हणजे मध्ययुगाची मर्यादा होती. नाही तर पुढल्या खंडातील प्रकरणांची नावे 'यादवांचा उच्छेद', 'होयसळांचा उच्छेद', 'चोळांचा उच्छेद', व शेवटी 'दक्षिण भारताचा उच्छेद' अशी त्यांना द्यावी लागली असती.
 'हिंदु भारताचा अंत' याचा इतिहास लिहून झाल्यावर त्यांनी या अंताची, या उच्छेदाची पुढील प्रकरणांत कारणमीमांसा केली आहे. ती करताना कडक जातिबंधने, राष्ट्रभावनेचा अभाव, स्वराज्याविषयीची उदासीनता, अहिंसाप्रवणता, हिंदूंतील धार्मिक ऐक्याचा नाश, कलिवर्ज्य प्रकरण, पतितपरावर्तनाचा निषेध