पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
४९
 

यांची साम्राज्ये, श्रीहर्षाचे साम्राज्य, ही साम्राज्ये त्यांच्या या गुणसंपदेची साक्ष देतील.
 हिंदुसमाज संघटनक्षम आहे काय, संघटित सामर्थ्य त्याने पूर्वी कधी निर्माण केले होते काय, असा आपला प्रश्न होता. पाश्चात्य- पौर्वात्य पंडितांच्या आधारे व इ. स. १००० पर्यंतच्या भारताच्या इतिहासाच्या साक्षीने, त्या प्रश्नाला आपल्याला आता निःशंकपणे उत्तर देता येईल की, होय. समाज संघटनेचे शास्त्र, चिरंजीव होण्याची ही राजविद्या हिंदुसमाजाने, जगातल्या इतर कोणत्याही समाजापेक्षा, त्या काळात जास्त अभ्यासिली होती, जास्त आत्मसात केली होती.

§