पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
४७
 

स्वकीयांपेक्षा जास्त सहिष्णुतेने व प्रेमाने वागविण्याची सध्याची परंपरा त्याकाळी भारतात नसल्यामुळे त्याने बौद्धांना कठोर दंड केला. वैदिक धर्मीयांनी वेदकाळापासून राष्ट्रनिष्ठा हे संघटनातत्त्व स्वीकारले होते. गुप्तकाळातही त्यांची ती निष्ठा जिवंत होती हे मिहिरगुलाचा त्यांनी जो निःपात केला त्यावरून स्पष्ट दिसून येते.

सुवर्णयुग :

 या निष्ठेमुळेच इ. स. पू. ३२७ पासून इ. स. ५२८ या आठशे-नऊशे वर्षांच्या काळात ग्रीकांची आक्रमणे, शककुशाणांची आक्रमणे आणि हूणांच्या टोळधाडी यांना तोंड देऊन त्यांचे भारताला निर्दाळण करता आले आणि आपला धर्म, संस्कृती व स्वत्व यांचे रक्षण करण्यात तो यशस्वी झाला. इ. स. ५२८ नंतर म्हणजे मिहिरगुलाचा पराभव झाल्यानंतर ५०० वर्षे भारताला शांततेची लाभली. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे या दीर्घकाळात भारत परकीयांच्या आक्रमणापासून अगदी मुक्त होता. मध्यंतरी महंमद कासीम याने सिंधवर स्वारी केली होती, पण ते आक्रमण, त्याच्या मते, अगदी एका प्रांतापुरते परिच्छिन्न असून त्याचा भारतावर तसा काहीच परिणाम झाला नाही. इ. स. ६०० ते १००० हा काळ भारताच्या इतिहासात मोठ्या उत्कर्षाचा झाला असे इतिहासवेत्त्यांचे मत आहे. कुलगुरु चिं. वि. वैद्य या काळाला विशेषतः ८०० ते १००० या काळाला भारताचे सुवर्णयुग मानतात. दीर्घकाल एका तत्त्वावर दृढ निष्ठा ठेवून भारतीयांनी जे संघटनसामर्थ्य जोपासले त्याचेच हे अमृतमधुर फळ त्यांना मिळाले, हे उघड आहे.
 त्या प्राचीन काळात हिंदूंनी संघटित सामर्थ्याची अशी जोपासना केली ही जगाच्या इतिहासातली असामान्य गोष्ट आहे. या काळात युरोपवर शककुशाण- हूण, गॉथ या रानटांच्या अशाच टोळधाडी कोसळल्या होत्या. पण त्यांपासून युरोपियांना, ग्रीकरोमनांनाही स्वतःचे, स्वतःच्या संस्कृतीचे रक्षण करता आले नाही. या रानटांनी त्यांची राज्ये, साम्राज्ये धुळीस मिळविली. कारण कोठल्याच संघटनतत्त्वाचा त्यांनी त्या काळात अवलंब केला नव्हता. आर्यांनी ऐश्वर्याची ही राजविद्या चांगली अभ्यासली होती. आणि हजारो वर्षे तिची दृढ उपासना चालू ठेविली होती. व्हिन्सेंट स्मिथने, या आक्रमकांशी भारताने जो मुकाबला