पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

मागे सांगितलेच आहे की इ. स. हजारपर्यंतचा भारताचा इतिहास हा वैभवाचा आहे, कर्तृत्वाचा आहे, ते सुवर्णयुग होय, याविषयी बहुतेक इतिहासवेत्त्यांचे एक मत आहे. त्याच्या सामर्थ्याला आणि म्हणूनच वैभवाला ओहोटी लागली ती इ. स. १००० नंतर. तेथून पुढे येथल्या समाजाची विघटना सुरू झाली हे त्याचे कारण होय. पण त्या विघटनेची कारणमीमांसा आपल्याला पुढील प्रकरणात करावयाची आहे. सध्या आपण हिंदूंच्या संघटित सामर्थ्याचा इतिहास पहात आहोत. हे सामर्थ्य इ. स. १००० पर्यंत टिकून होते. त्याचेच थोडे धावते अवलोकन करून हे प्रकरण संपवावयाचे आहे.

हिंदूंचे संघटित सामर्थ्य :

 सम्राट चंद्रगुप्त यांनी सेल्युकस निकेटर यांचे ग्रीक आक्रमण निर्दाळून टाकल्यानंतर व आपले साम्राज्य इराणच्या सीमेला नेऊन भिडविल्यानंतर पुढील सव्वाशे वर्षांत ग्रीकांची भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची छाती झाली नाही. पण अशोकानंतरचे मौर्य राजे अगदी कर्तृत्वहीन होते. त्यामुळे आक्रमकांची लोभी दृष्टी पुन्हा भारताकडे वळू लागली. आणि डेमिट्रियस या ग्रीक राजाने भारतावर स्वारी केली. या वेळी आणखी एक दुर्दैव भारतावर ओढवले होते. ते म्हणजे बुद्धधर्माची अहिंसा हे होय. शिकंदराच्या स्वारीच्या वेळी बौद्धधर्म मगधाच्या परिसरापलीकडे फारसा पसरला नव्हता. पंजाबात तर त्याचे नावही कोणाला माहीत नव्हते. पण त्यानंतर, सम्राट अशोकाने राजसत्तेच्या बळावर भारतात बौद्धधर्माचा, धम्मविजयाचा, अहिंसेचा प्रसार केला. त्यामुळे भारताची प्रथम प्रतिकारवृत्ती, नंतर प्रतिकार शक्ती, आणि शेवटी प्रतिकार यंत्रणा ढिली झाली. वर आपण पाहिलेच की, शिकंदराला विजय मिळविताना प्रत्येक अंगुळ भूमीसाठी लढावे लागले. पण आता ! डेमिट्रियस बॅक्ट्रियातून जो निघाला तो थेट अयोध्येला भिडला. मध्ये वाटेत त्याला कोणी आडवे गेलेच नाही. शिकंदराला व्यास नदीवरून निराशेने परतावे लागले, आणि डेमिट्रियस थेट अयोध्येपर्यंत यात्रेला यावा तसा आला याचा अर्थ काय ? याचा एकच अर्थ की शस्त्रबळाची निंदा, अहिंसेचे प्रेम, ऐहिक ऐश्वर्याचा तिटकारा हे त्रिविध रोग त्या वेळी मगधसाम्राज्याला जडले होते. सुदैव एवढेच की आजच्याप्रमाणे अखिल भारत त्या वेळी या रोगांनी