पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज-संघटनातत्त्व
३३
 

कर. याच भूमीवर आमच्या सामर्थ्यसंपन्न ऋषींनी यज्ञ, तपस्या व मंत्रोच्चार केलेला आहे.'
 कवीने व्यक्त केलेला हा अभिमान केवळ वाचिक नाही. भूमीसाठी वाटेल ते कष्ट करण्यास व प्रसंगी आत्मबलिदान करण्यासही तो सिद्ध आहे.

अहमस्मि सहमान उत्तरो नाम भूम्याम् ।
अभीषाड् अस्मि विश्वाषाड् आशामाशां विषासहिः ॥ ५४ ॥

 मी आपल्या मातृभूमीसाठी व तिच्या दुःखविमोचनासाठी सर्व प्रकारचे कष्ट भोगावयास सिद्ध आहे. मी सर्व दिशांना विशेषप्रकारे विजय मिळवीन व शत्रूंचा नाश करीन.

यद् वदामि मधुमत् तद् वदामि यदीक्षे तद् वनन्ति मा ।
त्विषीमानस्मि जूतिमान् अवान्यान् हन्मि दोधतः ॥ ५८ ॥

 माझ्या मातृभूमीच्या हिताचेच मी बोलेन व जे करावयाचे ते तिच्या साह्यासाठीच करीन. मी ज्योतिःपूर्ण, तेजस्वी व बुद्धिसंपन्न होऊन या भूमातेचे शोषण करणाऱ्या शत्रूंचा विनाश करीन.
 अशी ग्वाही देऊन सूक्ताच्या शेवटी कवीने मातृभूमीसाठी करावयाच्या अंतिम त्यागाचीही सिद्धता व्यक्त केली आहे.

दीर्घं न आयुः प्रतिबुध्यमाना
वयं तुभ्यं वलिहृतः स्याम ॥ ६२ ॥

 आम्हांस दीर्घ आयुष्य प्राप्त होवो. आम्ही उत्तम ज्ञानी व्हावे आणि मातृभूमीसाठी आम्ही आमचे बलिदान करावे.
 (अथर्ववेद- भाग २ रा, संपादक- पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, कांड १२, सूक्त १ ले. मंत्र ३५, १०, २, ३, ४, ५, ६, १४, ३९, ५४, ५८, ६२. अथर्ववेदाच्या या भागाला पंडित सातवळेकरांनी 'मातृभूमि आणि स्वराज्यशासन' असेच नाव दिले आहे.)
 पुराणांनी याच उत्कटतेने भारतवर्षाबद्दलचा अभिमान प्रगट केला आहे. विष्णुपुराण म्हणते, 'सहस्र जन्मांनंतर भारतवर्षात जन्म मिळतो. आणि येथे जन्मलेल्यांनाच स्वर्ग व मोक्ष प्राप्त होऊ शकतो.' वायुपुराणाने अशीच भारत-