पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

असंस्कृतपणा हे काही येऊ द्यावयाचे नाही या तत्त्वाचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. (४) यामुळेच सहिष्णुता व संग्राहकता ही महाव्रते त्यांनी अंगीकारिली व प्रत्येकाच्या धर्मभावनांचा, दैवतांचा व आचारांचा आदर केला.
 विश्वहिंदुपरिषदेला ही तत्त्वें दीपस्तंभासारखी मार्गदर्शक होतील यात शंका नाही.