पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
१७
 

तो आजच्या स्थितीत जी पुराणे दिसतात त्यांचा काळ होय. मूळ पुराणरचना वेदकाळीच झाली किंवा पुराणे वेदांपूर्वीही अस्तित्वात होती हे मत आता बहुमान्य झाले आहे. पण येथे जे विवेचन करावयाचे आहे ते सध्याच्या स्वरूपात जे इतिहास व जी पुराणे दिसतात त्यांच्या आधारे करावयाचे आहे. त्यांतील कथा अतिप्राचीन काळी, वेदसमकाळी किंवा तत्पूर्वीही, घडल्या असणे पूर्ण संभवनीय आहे. पण इतिहासपुराणांचा काळ म्हणताना इ. पू. ३०० ते इ. स. ८०० हा काळ येथे अभिप्रेत आहे. आणि पुष्कळ ठिकाणी इतिहास- पुराणे असा निर्देश न करता केवळ पुराणे असे म्हटले आहे तरी तेथे दोन्ही अभिप्रेत आहेत. अशा या इतिहासपुराणांनी वेदब्राह्मण या ग्रंथांप्रमाणेच भारतीय समाज एकरूप करण्याचा जो फार मोठा प्रयत्न केला त्याचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.
 वेदोत्तर व पुराणपूर्वकाळात भारतात फार मोठ्या घडामोडी झाल्या व समाजाचे स्वरूप अगदी पालटून गेले. उपनिषदांनी ब्रह्मविद्या निर्माण करून वैदिक यज्ञयागाचा व कर्मकांडाचा अगदी कटू असा निषेध केला. प्रत्यक्ष वेदांविषयी त्यांनी अनादर दाखविला नाही. ठायी ठायी पूज्य बुद्धीच प्रगट केली. पण वेदांवर उभारलेल्या कर्मकांडरूप धर्माचा मात्र फार अधिक्षेप केला. त्यामुळे एकंदर यज्ञधर्माची प्रतिष्ठा खूपच कमी झाली. पुन्हा वेदकर्त्या ऋषींच्या ठायी असलेली पहिली उदार दृष्टी आता राहिली नव्हती. भारतातल्या सर्व जमातींना या श्रेष्ठ धर्मात सामावून व्यावयाचे आहे, त्यांचे आर्यीकरण करावयाचे आहे हा पहिल्या ऋषींचा ध्येयवाद नव्या शास्त्रकारांच्या ठायी नव्हता. त्यामुळे बहुजनसमाज त्यांच्यापासून दूर जाऊ लागला. तुटून निघू लागला. याच वेळी आणि कदाचित याचमुळे बौद्ध व जैन धर्माचा उदय झाला. व त्यांनी आपल्या धर्नाला उदार रूप देऊन ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत सर्वाना तो सुलभ करून दिला व पाली व अर्धमागधी या बहुजनांच्या प्राकृत भाषांत त्याचे प्रतिपादन करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बहुजनांचा ओढा त्या धर्मांकडे होऊन वैदिक धर्माचा लोक त्याग करू लागले. त्यांतही बिंबिसारादि राजांचा त्या धर्माकडे कल होऊन बौद्धांना जास्तच उत्तेजन मिळाले. या सर्वामुळे वैदिक धर्मावर फार मोठी आपत्ती कोसळून भारतीय समाज विघटित होऊ लागला. समाजाची धर्मनिष्ठा विचलित होऊन त्याची ऐक्यभावना भंगण्याचा कठिण समय प्राप्त