पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२५३
 

ते सर्वत्र दौरे काढून मंडळाचे उद्दिष्ट साधीत असतात.
 याशिवाय हिंदुमिशनरी सोसायटी, श्रद्धानंद अनाथ महिलाश्रम, मुंबई: पंढरपूर अनाथबालकाश्रम, अनाथ महिलाश्रम-पुणे, गुरुदेवसेवा मंडळ, आदिवासी समाजसुधार सभा, छोटानागपूर; विदर्भ महारोगी सेवामंडळ, तपोवन अमरावती; कर्मवीर बाबासाहेब आमटे यांची कुष्ठरोगवसाहत, आनंदवन, वरोरा; अशा अनेक संस्था हिंदुसमाजातील अनाथ अपंगांची, दीनदलितांची सेवा करून हिंदुधर्माच्या मूलतत्त्वांचा आचार करीत आहेत. स्थलाभावी त्यांची सविस्तर माहिती येथे देता येत नाही.

तुलनेने पाहता :
 आदिवासी, अस्पृश्य, उपेक्षित, बहिष्कृत, परित्यक्त, अनाथ, अपंग, पतित, दीन, दलित यांच्या उद्धारार्थ काम करीत असलेल्या या संस्थांचे कार्य पाहून मनाला समाधान वाटते. त्यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की, या हिंदुसमाजाचा मोहरा आता फिरला आहे. गेल्या हजार वर्षांतील समाजघातकी रूढी, धर्मशास्त्रकारांनी रूढविलेला तो अधर्म, नष्ट करून, विघटनापोषक सर्व तत्त्वांचे निर्मूलन करून हा समाज संघटित व बलशाली करण्याच्या मार्गास तो लागला आहे आणि कोणत्या मार्गाने जावयाचे हे त्याने निश्चित केले आहे, याविषयी शंका राहात नाही. पण ३०-४० कोटींचा हा समाज पहाता हे प्रयत्न, हा उद्योग अगदी अल्प, अत्यल्प आहे हे आपण ध्यानी घेतले पाहिजे. मुस्लीम मुल्ला-मौलवी, ख्रिश्चन मिशनरी यांच्या तुलनेने पाहता हे प्रयत्न नसल्यासारखेच वाटतात. त्यांच्या त्या उद्योगाच्या मागे प्रचंड संघटना उभ्या आहेत आणि अक्षय असा निधी आहे. त्यांशी सामना देऊन हिंदुसमाजाचे संरक्षण व संवर्धन करावयाचे तर वर सांगितल्या तशांपैकी एकट्यादुकट्या संस्थेला ते अशक्य आहे. त्यासाठी अखिल भारतव्यापी अशी एक प्रचंड संस्थाच उभी केली पाहिजे आणि हे मनात येताच विश्वहिंदुपरिषदेचे नाव पुढे येते.
 वर उल्लेखिलेल्या संस्थांची वृत्ते वाचताना एक गोष्ट ध्यानात येते की, या अनेक संस्थांत एकसूत्रीकरण नाही. त्यांचा एकमेकींशी काही संबंध नाही. त्यामुळे संस्था अनेक असून त्या एकाकीच आहेत. त्यांचे बल संघटित झाले तर त्या यापेक्षा दसपट कार्य सहज करू शकतील; पण अखिल भारतीय स्वरू-