पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२२९
 

काळी ब्रह्मप्रेमाने येथले थोर पुरुष समाजहिताची उपेक्षा करीत, आता अहिंसा- प्रेमाने, एवढाच फरक. वैयक्तिक दृष्टिकोण दोहीकडे तोच आहे. ही वैयक्तिकता अत्यंत वरच्या, अत्यंत उदात्त पातळीवरची आहे हे खरे, पण राष्ट्रहिताच्या दृष्टीने ती त्याज्यच आहे. ती विकृतीच आहे. तीतूनच- त्या अहिंसाप्रेमातूनच- पाकिस्तानचा जन्म झालेला आहे. तो झाल्यावर राहिलेल्या भारताविषयी तरी आमच्या नेत्यांनी खंबीर, कणखर धोरण अवलंबावयाचे होते ! पण ते हिंदूंच्या रक्तातच नाही. त्यामुळे काश्मीर, आसाम, कच्छ हे प्रदेशही पाकिस्तानात जाण्याची वेळ आली आहे. याचेही कारण तेच. विश्वकल्याण, सत्य, जागतिक न्याय, यांवर राष्ट्रीय स्वार्थापेक्षा आमच्या नेत्यांची जास्त निष्ठा आहे. याचा अर्थ इतकाच की, त्या तत्त्वाचा ते उद्घोष करीत असतात. हाच तर हिंदु- समाजाचा आज हजारो वर्षांचा रोग आहे. 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या तत्त्वाचा मुखी उद्घोष आणि प्रत्यक्षात काही मानवांची सावलीसुद्धा घ्यावयाची नाही इतकी विषमता. सत्य, अहिंसा, समता, न्याय यांचा पाठ म्हणणाऱ्या काँग्रेजनांची हीच स्थिती आहे. रोजच्या कारभारात, निवडणुकीच्या काळात, सत्ताप्राप्तीच्या समयी त्यांना या तत्त्वांची आठवणही राहात नाही. मुस्लीम लीग जातीय आहे, अराष्ट्रीय आहे असे शंभर वेळा तरी दरसाल ते म्हणतात; पण निवडणुका जवळ आल्या की तिच्याशी हातमिळवणी करण्यात आपण राष्ट्रनिष्ठेशी प्रतारणा करीत आहो असे त्यांना वाटत नाही. निधर्मी म्हणून पुकारलेल्या राज्यात फत्त हिंदूंपुरतेच कायदे करण्यात काही असत्य आहे, काही अन्याय आहे, अशी शंकासुद्धा काँग्रेननेत्यांना येत नाही. सारांश काय, आपापली संस्थाने व राज्ये टिकावी म्हणून आक्रमकांपुढे जे धोरण मागल्या काळी हिंदुराजे, सरदार, मिसालदार, संस्थानिक अवलंबीत असत त्यात आज फारसा फरक पडलेला नाही. पूर्वी राजसत्ता होती, आता लोकसत्ता आहे; पण लोकसत्तेत निवडणूक ही सत्ताधाऱ्यांना तितकीच लाचार व भ्रष्ट बनविते, राष्ट्रनिष्ठेला तीही तसाच सुरुंग लावते हे स्पष्ट आहे. मुस्लीम लीग, आसामात घुसणारे पाकिस्तानी, लूटमार, बलात्कार, अत्याचार करणारे मुस्लीम गुंड यांच्यापुढे लाचारी पतकरून काँग्रेसने हे स्पष्ट केले आहे.

धर्मांतर हे राष्ट्रांतर-
 मुस्लीमांप्रमाणे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीतले काँग्रेसचे धोरणही असेच