पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुपदपातशाही
१७५
 

अटळ होतो. भारताच्या गेल्या अनेक शतकांच्या इतिहासाचे हे सार आहे स्वराज्य व स्वधर्म यांचा संयोग घडवून विजयनगरने या अधःपातापासून दक्षिण भारताचे संरक्षण केले. मराठ्यांनी धर्मनिष्ठेला राष्ट्रनिष्ठेची जोड दिली. त्यामुळे अखिल भारताचे त्यापासून रक्षण करून हिंदुपरंपरा व हिंदुधर्म यांचे मुस्लीम आक्रमणापासून रक्षण करण्यात त्यांना यश आले. त्याच निष्ठांचे येथील धर्मवेत्त्यांनी संवर्धन करून त्या जनतेत दृढमूल केल्या असत्या तर पाश्चात्य आक्रमणापासूनही आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यात मराठे यशस्वी झाले असते आणि भारतात त्यांनी अत्यंत दृढ व बलशाली अशी हिंदुपदपातशाही स्थापन केली असती यात शंका नाही.

§