पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१०९
 

करून त्या पुरातन नगरीचा व तेथील देवालयांचा नायनाट केला. आणि तेथून उज्जनीवर चालून जाऊन त्याने महाकाळाचे प्रसिद्ध देवालय फोडले आणि विक्रमादित्याची मूर्तीही तोडून टाकली.

स्थितप्रज्ञ हिंदू राजे :
 अल्तमशनंतर जवळ जवळ तीस वर्षे म्हणजे १२६६ मध्ये बल्बन सुलतान होईपर्यंत पुन्हा हिंदूना अवसर मिळाला होता. कारण या काळात दिल्लीचे सुलतान अगदी दुबळे होते व राजसत्ता विस्कळित झाली होती; पण पुनरुत्थान करण्याचे सामर्थ्यं हिंदूच्या ठायी राहिलेच नव्हते. विंध्याच्या दक्षिणेस दावण गिरीचे यादव, हळेबीडचे होयसळ यादव, मदुरेचे पांड्य, आणि वरंगळचे काकतीय यांची विशाल राज्ये होती. त्यांना तर तीनशे वर्षे अवसर मिळाला होता. पण ते सावध झाले नाहीत. उत्तर हिंदुस्थानात मुस्लीमांकडून होणारे अत्याचार, त्या कत्तली, ते बलात्कार, ती जाळपोळ, तो विध्वंस हे सर्व ते हिंदु सम्राट स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने पहात बसले होते. १२९४ साली अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या यादवांचा नाश केला. त्यानंतर दहा वर्षे तो दक्षिणेत उतरला नाही. म्हणजे दक्षिणेत आक्रमण आल्यावरही पुन्हा दहा वर्षांचा अवधी मिळाला होता. पण तीनशे वर्षांत ज्यांना तयारी करता आली नाही त्यांना दहा वर्षांत काय साधणार ? दहा वर्षांनी अल्लाउद्दिनचा सेनापती मलिक काफूर याच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. आणि पुढील पंधरा वर्षांत वर निर्देशिलेली सर्व राज्ये विध्वंसून तो रामेश्वरला पोचला आणि तेथे त्याने एक मशीद उभारली. हा काफूर प्रथम एक अस्पृश्य हिंदू होता. त्या वेळी त्याला सूर्यचंद्र वंशांतल्या राजांच्या सैन्यात शिपाई म्हणून सुद्धा प्रवेश मिळाला नसता. पण मुसलमान होताच त्याने या वंशांतल्या राजांची साम्राज्ये सहज लीलेने विलयाला नेली. आणि पुढे तर तो दिल्लीचा कर्ताकरविता झाला. तो सुलतानही झाला असता पण तेवढ्यात त्याचा खून झाला. दुसरा एक पूर्वीचा अस्पृश्य, खुश्रूखान, हा तर प्रत्यक्ष दिल्लीचा सुलतान झालाच. हिंदू असताना हे दोघेही अंत्यज एवढ्या मोठ्या पदाला चढू शकले नसते. पण हे पाहूनही हिंदूंची जन्मसिद्ध जातिव्यवस्था व त्यांचे ते सनातन चातुर्वर्ण्य जागे झाले नाही अंत्यज हे जन्मोजन्मी अस्पृश्यतेच्या नरकात राहिले पाहिजेत असे हिंदुधर्म-