पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्न:- या संस्कृतीचें थोडक्यांत स्वरूप काय ? उत्तर:- ज्ञान, यज्ञ, दान, तप आणि शौच हे होय. प्रश्न:- यज्ञ म्हणजे काय ? र:- देवेचें ज्ञानपूर्वक पूजन करणे. पूजन म्हणजे सर्व प्रकारचे उत्तर:- द संस्कार होत, प्रश्न:- दान म्हणजे काय ? उत्तरः- पूज्य व्यक्तींना प्रिय वस्तु मनःपूर्वक व नम्रतेने देणे यास दान असे म्हणतात. प्रश्न: - तप म्हणजे काय ? उत्तर:- वर्णाश्रमधर्माप्रमाणे आपणावर आलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणें यास तप असे म्हणतात. ( सपःस्वधर्म- वर्तित्वम्. ) प्रश्नः- शौच म्हणजे काय ? उत्तरः-शौच म्हणजे शुद्धता. वंश, आचार व विचार ह्या सर्वो- च्या शुद्धतेचा शौचांत अंतर्भाव होतो. ( शौचः संकरवर्जनम्. ) प्रश्नः-यांत कांहीं भेद आहेत काय ? उत्तरः-होय. कायिक, वाचिक आणि मानसिक हे तनि भेद प्रत्येकांत आहेत. संस्कार प्रश्न :- संस्कार म्हणजे काय ? उत्तरः- शरीर आणि मन हीं उत्तम गुणांनीं युक्त होण्यास केल्या नाणाऱ्या शास्त्रोक्त क्रिया, त्यांस 'संस्कार' असे म्हणतात.