पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्नः - संस्कार किती आहेत ? उत्तर:- शास्त्रांत सांगितलेले एकंदर संस्कार अद्वेचाळीस आहेत त्यांत सोळा विशेष मानले जातात. प्रश्नः- सोळा संस्कार कोणते ? उत्तर:- गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातक र्म, नामकर्म, अन्न- काशन, चूडाकर्म (चौल), उपनयन, मेधाजनन महानाम्नी, महाव्रत, उपनिषद्, गोदान, समावर्तन, विवाह व अन्त्येष्टि. आचार. प्रश्नः - आचार म्हणजे काय ? उत्तर:—आचार म्हणजे वर्तणूक. विशेषतः धर्मविषयक वर्तणु- कीला आचार हा शहू लाविला जातो. प्रश्नः - I

- हिंदुधर्माचे मुख्य आचार कोणते ?

— उत्तर: – भजन, पूजन आणि मनन ह्यांपैकी कांहोंहि केले असतां हिंदुधर्माचे आचार पाळले असे होते. पंचमहायज्ञांचा ह्याम- ध्येच समावेश होतो. प्रश्न: – हिंदुधर्माची सर्वसामान्य खूण कोणती ? उत्तर:—शेंडी आणि तिलक. जानवें फक्त त्रैवर्णिक धारण करतात प्रश्न: -- धर्मविधि कोणामार्फत करावेत ? उत्तर:- धर्मशील ब्राह्मणद्वारा करावेत किंवा स्वतः करावेत. कोणाहिमार्फत केले, तरी ने विधि यथासांग होतात किंवा नाहीं यांचे ज्ञान कर्त्यास आवश्यक आहे.