पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्नः-वेदांत कोणकोणत्या ग्रंथांचा समावेश होतो ? उत्तर:- संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद् प्रश्नः - संहिता म्हणजे काय ? उत्तर:- मंत्रात्मक भागास ' संहिता' म्हणतात. मन्त्र म्हणजे स्तुतिरूप असणारे छन्दोबद्ध भाग होत. याला फक्त यजुर्वेदाच्या कांही संहिता अपवाद आहत. यजुवेदांत संहिता ब्राह्मणमिश्रित आहेत. प्रश्नः ब्राह्मण म्हणजे काय ? उत्तरः - विधि म्हणजे अमुक करा, अमुक करू नका असे सांगणाऱ्या ग्रंथास ' ब्राह्मण' असं म्हणतात. प्रश्न: आरण्यक म्हणजे काय ? उत्तर:- आरण्यक आणि उपनिषद् हीं एकाच स्वरूपाची असतात. दोन्हीमध्यें तत्त्वज्ञानावर भर असता. आरण्यकांत कर्ममार्गाचें जरा जाम्त प्रतिपादन असतें. प्रश्न:- संहिता चारच आहेत कां जास्त आहेत ? उत्तर: जास्त जाहेत. प्रत्येक वेदाच्या काही तरी कारणाने बन्याच शाखा होत्या; आणि त्यामुळे संहिता व ब्राह्मण यांचे बरेच ग्रंथ असावेत असें जुन्या ग्रंथांवरून दिसतें. प्रश्नः--ऋग्वेद म्हणजे काय ? उत्तर:- र:- ऋचू म्हणजे छन्दांत असणारे मन्त्र, त्यांचा संग्रह केलेला जो वेद तो ऋग्वेद होय. यामध्धें अग्नि, इंद्र, वरुण, सोम, अश्श्री मरुत् वगैरे देवतांच्या स्तुतिपर अनेक वृत्तांतील सूक्के आहेत, ऋचांनी युक्त असणारा हा वेद म्हणून यास ऋग्वेद अर्से म्हणतात.