पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ प्रश्नः- पुराणमतवादी हिंदु अशा लोकांना जवळ करतील काय ? उत्तर:- नाहीं. अशा विचारसरणीचे लोक कोणत्याही धर्मोत असतातच. त्यांत त्यांचा उद्देश इतकाच असतो कीं, धर्मोत कडवे धार्मिक लोक असावेत, अर्धवट नसावेत. प्रश्न: –परधर्मीय लोक हिंदु झाल्यास हिंदू लोक त्यांचा कोणत्या जातींत स्वीकार करतील ? उत्तर: – विशिष्ट मुदतींत बाटलेला मनुष्य पुनः हिंदूत येत असेल, तर त्याचा त्याच जातींत स्वीकार केला जातो. परंतु मर्या- देच्या बाहेरील किंवा हिंदुकुलामध्ये उत्पन्न न झालेल्या परधर्मीयांस वेगळी जात म्हणून हिंदुत समाविष्ट केले जाते. अशा अनेक जाती हिंदूत समाविष्ट केल्या गेल्या आहेत. ईश्वर निराकार आणि एक आहे. प्रश्नः -- ईश्वर एक आहे की अनेक आहेत ? उत्तरः -- ईश्वर एकच आहे. अनेक नाहींत. प्रश्नः – मग विष्णु, कृष्ण, विठ्ठल, गणपति, मारुते धगैरे देव अनेक दिसतात हें कसें ? उत्तरः- - मनुष्यप्राण्यांनी कल्पिलेले हे प्रकार आहेत. हे खरे नव्हेत. मनुष्यप्राणी आपल्या मनाची एकाग्रता होण्याकरितां मनाला रुचेल तो आकार देवाला दऊन देवाची उपासना करीत असतो. त्यामुळे ईश्वर साकार आणि अनेक आहेत असा अज्ञ लोकांस भास होतो. वस्तुतः ईश्वर निराकार :आणि एकच आहे. प्रश्न:- - ईश्वर कोठें असतो ? उत्तरः - स्थिर आणि चर सृष्टीत म्हणजे चहूकडे ईश्वर भरलेला आहे.