पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रश्न: - पुनर्जन्म म्हणजे काय ? उत्तरः- मोक्ष प्राप्त होईतोपर्यंत जन्म आणि मरण ह्यांच्या फेन्यांत असणे ह्यास 'पुनर्जन्म' म्हणतात. प्रश्न :- कर्मानुरूप फलप्राप्ति म्हणजे काय ? उत्तर:- जसें कर्म केलें असेल, त्याप्रमाणे ह्या जन्मीं किंवा पु- ढील जन्मीं फलप्राप्ति होणे यास कर्मानुरूप फलप्राप्ति असें म्हणतात.

- मोक्ष म्हणजे काय ?

प्रश्नः उत्तर:-जीव आणि आत्मा यांचें ऐक्य होऊन आत्मरूप बनणे यास 'मोक्ष' असें म्हणतात. प्रश्नः- इतर धर्मानें मोक्ष मिळणे शक्य आहे की नाही ? उत्तर:- नाहीं. ते धर्म मोक्षप्राप्तीला उपयोगी असणाऱ्या कांहीं गुणांचा उत्कर्ष करतात इतकेंच. मोक्ष प्राप्त होण्यास हिंदुधर्मच स्वीकारला पाहिजे, किंवा या जन्मीं सदाचरणानें आत्मशुद्धि करून दुसन्या जन्मांत हिंदु होण्याची इच्छा केली पाहिजे. पतितपरावर्तन. प्रश्नः - - परधर्मात गेलेला हिंदू पुनः हिंदू होऊं शकतो की नाहीं ? उत्तर:- - ·होऊं शकतो. याबद्दल देवल स्मृतींत चांगला विचार केला आहे, आणि वेदग्रंथांपासून अर्वाचीन कालापर्यंत या गोष्टीस आधार आहे. प्रश्नः-परधर्मीय माणसास हिंदु होता येते की नाही ? हिंदु होण्यास हरकत उत्तर:- कोणत्याही धर्मातील माणसास नाहीं;म्हणूनच पूर्वी अनार्य, शक व अनेक इतर जाती हिंदूत समाविष्ट होऊं शकल्या.