पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तर:-चार आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, यानप्रस्थाश्रम, व संन्यासाश्रम. प्रश्न:- ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय ? उत्तर:- ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि 'चर्य' म्हणजे नियमबद्ध वर्तन. विद्यार्जनाच्या कालास ब्रह्मचर्य असें म्हणतात. हा काल उपनयन झाल्यापासून विवाहापर्यंत असतो. विद्यासंपादन होईपर्यंत विद्यार्थी गुरुगृहीं रहात असे. प्रश्न: - गृहस्थाश्रम म्हणजे काय ? 4 उतर: – विद्यार्जन संपवून विवाह करून प्रपंच करणे व धर्म, अर्थ व काम साधणे म्हणजे धर्मविहित आचरण ठेवून धनोत्पादन व प्रजोत्पादन करणें. : प्रश्न: - वानप्रस्थ म्हणजे काय?. उत्तर: – गृहस्थाश्रम सोडून लोकसेवा करीत धर्माचरणपूर्वक वैराग्य वृत्तीने राहण्याचा अभ्यास करणे. यास वानप्रस्थाश्रभ असें म्हणतात. प्रश्न: - संन्यास म्हणजे काय? उतर: – पूर्ण वैराग्यानें मोक्षप्राप्तीचा यत्न करणे यास संन्यासा- श्रम म्हणतात. या चारहि आश्रमांचे विधि, आचार वगैरे स्मृतिग्रंथांत सविस्तर सांगितले आहेत ने जिज्ञासूंनी पहावेत. प्रश्न:- तत्वज्ञान.

- हिंदुधर्माची मुख्य तत्वें कोणती ?

उत्तर:- पुनर्जन्म आणि कर्मानुरूप फलप्राप्ति 'होत.