पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ प्रतिगामी राष्ट्रवाद वर्ग आणि सुशिक्षित याना मुसलमान समाजाचे हितसंबध हिंदी राष्ट्राशीच कायमचे निगडित झालेले आहेत याची जाणीव झाली. त्यानी आगाखान अमीर अल्ला आदिकरून सनातनी पुढा-याना उलथून टाकून मुस्लीम लीगला ताळ्यावर आणले. सारांश, ज्याप्रमाणे काँग्रेस ही हिंदूची भांडवलशाही संस्था बनली, त्याचप्रमाणे मुस्लीम लीग ही इस्लामी भांडवलदारांची संस्था झाली. १९१६ मध्ये या दोन्ही संस्थांची एकी होऊन हिंदी भांडवलशाहीचा एक अभेद्य किल्ला निर्माण झाला. अर्थात्च त्या भांडवलशाहीने वसाहतीचे स्वराज्य ह्मणजेच हिंदी भांडवलशाहीचे राज्य हे ध्येय पुढे ठेवून काँग्रेसलीग या दोन्ही संस्थांच्या द्वारे जोमाचा राजकीय लढा चालविला. तथापि अद्यापपावेतो बहुजनसमाज हा मग तो हिंदूंचा असो, किंवा मुसलमानांचा असो, राजकीय चळवळीपासून अलिप्त होता. १९१६ पासून कॉग्रेसच्या चळवळीला निराळे वळण लागले. टिळक बिझांटप्रभृति हिंदी संस्कृतीचे श्रेष्ठत्व गाणा-या पुढान्यांच्या हाती काँग्रेसची सूत्रे आल्यामुळे कनिष्ठ मध्यम वर्गाच्या तरुणाची मने होमरूल चळवळीकडे आणि काँग्रेसकडे आकर्षित झाली. आतापर्यंत काँग्रेस ही संस्था राजकीय विषयावर चर्चा करून ठराव पसार करण्यापलिकडे काही एक कार्य करीत नव्हती. १९१६ पासून तिला संघटित स्वरूप प्राप्त होऊ लागले, आणि ती कृतिक्षम बनू लागली. ब्रिटिश साम्राज्यशाहीशी झगडणा-या अशा राजनैतिक पक्षात तिचे रूपांतर होणार अशी चिन्हे दिसू लागली. जनतेत जागृतीचे चैतन्य खेळू लागले. सरकारपासून जास्त सवलती प्राप्त करून घेण्यास ही संधि बरी आहे असे हिंदी भांडवलदाराना व त्यांच्या नेमस्त पुढा-यांना वाटू लागले. या युद्धप्रसंगी सरकारही हिंदी भांडवलदाराना उदार हस्ते आर्थिक आणि राजनैतिक सवलती देण्यास पुढे सरसावले. हिंदी कारखान्याकडे युद्ध साहित्य पुरवण्यासाठी मागण्या पाठविण्यात येऊ । लागल्या. हिंदी भांडवलावर उभारलेल्या व युद्धसामुग्री उत्पन्न करणा-या ।