पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद [७६ ठून येतील. याला मुख्य कारण काँग्रेसमध्ये प्रभावी बनलेला सतातनी अगर प्रतिगामी राष्ट्रवाद असे ह्मणता येईल. या राष्ट्रवादाची उभारणीच आधी आक्रमक हिंदु धर्मतत्त्वावर केलेली होती. त्याला हिंदु राष्ट्रवाद हेच नाव अधिक शोभते. अर्थात् जहाल पक्ष हा एक हिंदूचाच पक्ष आहे असे मुसलमानाना वाटू लागले. शिवाय मुसलमानातील वरिष्ठ वर्ग हा हिंदूंना तुच्छ मानत असे. मुसलमान जेते आणि राज्यकर्ते आणि हिंदू जित गुलाम असे तो वर्ग ह्मणत असे. हिंदुस्थानाशी आपले हितसंबंध निगडित झाले आहेत, हिंदुस्थान हे आपले राष्ट आहे ही भावना त्या वर्गात प्रादुर्भूत झालेली नव्हती. या वरिष्ठ वर्गाचे पुढारी मुसलमान बुद्धिजीवि यांची दृष्टि तुर्कस्थानादि मुसलमान राष्ट्रांच्या संयुक्त घटनेवर होती. त्या काल्पनिक घटनेत हिंदी मुसलमानानी सामील व्हावे असे त्याना वाटे, हिंदी बुद्धिजीवीप्रमाणे त्यांचा दृष्टिकोण पुरोगामी झालेला नव्हता. कारण ज्या अलिगड कॉलेजमध्ये त्याना शिक्षण दिले जात होते तेथे मुसलमानी धर्माचे अत्यंत प्रस्थ होते. शिवाय ब्रिटिशानी हिंदुस्थानास सत्ता समर्पण केल्यास, हिंदूचे प्राबल्य होईल आणि आपला धर्म बुडेल या भीतीने मुसलमान वरिष्ठाना ब्रिटिश राज्यच हवेसे वाटे, मुसलमान बुद्धिजीवींच्या मनावरची इस्लामी सरंजामी विचारसरणीची पकड अद्याप निसटलेली नव्हती. हिंदु बुद्धिजीवि आणि मुसलमान, बुद्धिजीवि यांच्यातील भिन्न विचारसरणीचा फायदा परकीय राज्यकर्त्यांनी घेतला असल्यास त्यात नवल वाटण्याजोगे काय आहे ? पण ही वस्तुस्थिति फार काळ टिकली नाही. विसाव्या शतकारंभी हिंदंच्याप्रमाणे मसलमानातही क्रमाक्रमाने व्यापारी आणि औद्योगिक भांडवलदार वर्ग उदय पावला. त्याबरोबर त्या वर्गाचा बौद्धिक नेता मुसलमान सुशिक्षित वर्ग याचीही वाढ होऊ लागली.मुसलमान भांडवलदार