पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५ प्रतिगामी राष्ट्रवाद टिळकाचे प्रतिस्पर्धी नेमस्त पुढारी गोखले व मेहता हे दोघेही कालवश झाले. राजकीय हक्क आणि आर्थिक सवलती प्राप्त करून घेण्यास युद्धाची संधि बरी आहे असे टिळक प्रभृति जहालाना वाटले. त्यानी काँग्रेसचे वसाहतीच्या स्वराज्याचे ध्येय मान्य करून काँग्रेसमध्ये शिरकाव केला. जहाल मवाळ एक झाले. पुरोगामी राष्ट्रवादाचा विजय झाला. युद्धामुळे देशी उद्योगधंद्यास चालना मिळाली; अभिनव उद्योगधंदे अस्तित्वात आले. हिंदी भांडवलशाहीची दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. काँग्रेस ही झाली तरी भांडवलशाहीची राजनैतिक हत्यार बनली. । १९१६ साली सुरू झालेली होमरूलची चळवळ ही हिंदी भांडवलदार वर्गाला राजकीय हक्क आणि आर्थिक सवलती प्राप्त व्हाव्या ह्मणून उभारलेली चळवळ होय ! त्या चळवळीच्या उत्पादिका अॅनी बिझांटबाई या ब्रिटिश साम्राज्याच्या प्रेमाने ओथंबलेल्या होत्या. साम्राज्यातून हिंदुस्थानाने फुटून जाऊ नये या दूरदृष्टीने त्या बाईनी ही चळवळ आरंभली. लो. टिळक प्रभृति जहालानी आणि सुरेन्द्र बॅनर्जी आदिकरून नेमस्तानी । त्या चळवळीला जोराचा पाठिंबा दिला. ऐतिहासिक दृष्ट्या १९१६ साल हे अत्यंत महत्वाचे होऊन गेले. त्या वर्षी हिंदु मुसलमान ऐक्य घडून आले. । | १९१६ सालच्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन लखनौ येथे भरले. मुस्लिम लीगची बैठक हीसुद्धा याच वेळेस लखनौ येथेच यशस्वीपणे पार पडली. काँग्रेसचा कार्यक्रम आणि मागण्या याना मुस्लिम लीगने बिनशर्त एकमुखी पाठिंबा दिला. काँग्रेसचा आणि लीगचा असा मिळून एकच स्वराज्याचा खर्डी बाहेर पडला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य ( ज्यात पूर्ण आर्थिक स्वायत्तता आहे असे ) हे दोन्ही संस्थांचे ध्येय ठरले. येथपर्यंत मुसलमान हे काँग्रेसपासून बहुशा अलिप्त असेच होते. नाही ह्मणायला काँग्रेसच्या संस्थापकात एक दोन मुसलमानांची नावे आद.